नागपूर :-पोलीस ठाणे वाडी हद्दीत लाव्हा, वाडी येथे बालाजी गोल्डन ट्रान्सपोर्ट नावाची फिर्यादी मनोज मोहनलाल शवकानी वय ४८ वर्ष रा. लॉट नं. १०४, आंबेडकर नगर, लेव्ही अॅकेडेव्वा, अमरावती रोड, नागपूर यांची ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. त्यांचे कंपनीत आरोपी मुरलीधर मालचंद आसोपा वय ३८ वर्ष रा. नापासर, आसीया गल्ली, ता. जि. बिकानेर, राजस्थान, ह.मु वाडी हा काम करतो. फिर्यादी यांचा आरोपीवर विश्वास असल्याने त्यांनी आरोपी कडे कंपनीचे बैंक खात्याने सर्व व्यवहार व लेन देन काम सोपविले होते. आरोपीने दिनांक २५.०५,२०२४ ते दि. २६,०६, २०२४ दरम्यान स्वतःचे आर्थिक फायद्या करीता कंपनीतील रजिस्टर मध्ये बनावट नोंदी घेवून स्वतःचे खात्यावर तसेच इतर खात्यावर एकुण ४३,५४,६५३/- रू ट्रान्सफर करून फिर्यादीचा व कंपनीचा विश्वासघात करून फसवणुक केली. फिर्यादी यांनी आरोपीला पैसे परत मागीतले असता आरोपीने फिर्यादीस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाडी येथे पोउपनि उत्तम जायभाये ९५५२५३८०९८ यांनी आरोपीविरूध्द कलम ४०८, ४१७, ४१८, ४२०, ४२३, ४६५, ४६७, ४६८, ५०६(ब) भा.द. वि. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध व पुढील तपास सुरू आहे.