नागपूर :-दिनांक २८,०७,२०२३ चे १७.२० वा. चे सुमारास फिर्यादी यश सुनिल मिश्रा वय २६ वर्ष रा. १०१, गोकुल हाउसिंग सोसायटी, गोरेवाडा रोड, हा त्यांची मैत्रीण संस्कृती सचिन मिश्रा वय २६ वर्ष रा. रचना नक्षत्र अपार्टमेंट, जगदिश नगर, काटोल रोड, नागपूर हिचे सह अँक्टीका दुचाकी वाहन क्र. एम.एच ३१ एफ. व्ही ७५५७ ने पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत रविनगर चौक येथून जात असता मागुन येणाच्या ट्रक क. एम.एच ४० ए ४२५८ चा चालक आरोपीने त्याने ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीचे अॅक्टीव्हा गाडीला धक्का दिल्याने फिर्यादी व त्यांची मैत्रीण दोघेही खाली रोडवर पडले ट्रकचे चाक संस्कृती हीचे डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादी याचे पायाला मार लागून जख्मी झाला. ट्रक चालक कोणतीही मदत न कराता घटनास्थळावरून पळून गेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे अंबाझरी येथे सपोनि देवकर यांनी आरोपी ट्रक चालका विरुद्ध कलम ३०४(अ) २७९, ३३७ भा.दं.वी सहकलम १३४, १७७, मो.सा.का. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.