प्राणांतीक अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- मनोज मुकुंदराव मेंढे वय ५८ वर्ष रा. गोरेवाडा वस्ती, मेंढे हार्डवेअर जवळ, गोरेवाडा, नागपूर हे पागलखाना चौका कडुन कोराडी कडे जाणारे सर्विस रोडने त्यांचे मोपेड वाहन कमांक एम. एच ४० ए.व्ही २७८४ ने जात असतांना कल्पना टॉकीज चौकाजवळ त्यांचे पाठीमागून येणारा चार बाकी गाडी क्र. एम.एच ३१ एफ.आर ४५२९ चा चालक आरोपी याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन, मनोज मेंढे यांचे वाहनाला धडक दिल्याने ते खाली पडुन गंभीर जखमी झाले. जखमी यांना उपचाराकरीता प्रथम कुणाल हॉस्पीटल व तेथुन मेडीकल हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी उपचारादरम्यान दि. २३.०७.२०२४ चे २०.५० वा. पुर्वी तपासून मृत घोषीत केले.

याप्रकरणी फिर्यादी श्रीकांत मनोज मैदे वय २७ वर्ष रा. गोरेवाडा जुनी वस्ती, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे मानकापूर येथे पोउपनि. देशमुख यांनी वाहन चालक आरोपीविरूध्द कलम १०६(१), २८१, १२५(व) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस ठाणे बल्लारशाह येथील खुनाचे प्रयत्नातील पाहिजे आरोपीस अटक

Thu Jul 25 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे बल्लारशाह, जि. चंद्रपूर येथील कलम १०९, ११८, ३२६ (जि), ६(२) भा.न्या.सं. सहकलम ३(अ) बारी पदार्थ अधिनीयम १९०५ मधील पाहिजे आरोपी हा त्याचे पांढऱ्या रंगाचे डस्टर कारने नागपूर शहरातील मानेवाडा परिसरात असल्याचे प्राप्त माहितीवरून गुन्हेशाखा युनटि क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन आरोपी नामे निरज संतोष गुप्ता, वय २६ वर्षे, रा. श्रीराम वार्ड, गांधी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com