प्राणांतीक अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हद्दीतुन तकीयावाले बाबा दर्गाह समोर, नागपूर ते हिंगणा कडे जाणारे रोडवरून राजु तुळसीराम वाघमारे वय ४० वर्ष रा. पंचशील नगर, नागपुर हे रस्त्याने पायदळ जात असतांना, त्यांना एक क. एम.एच ४० डी.एल ७७४९ चे चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन, रोडने पायदळ जाणारे राजु वाघमारे यांना धडक देवुन गंभीर जखमी केले. जखमी यांना उपचाराकरीता लता मंगेशकर हॉस्पीटल येथे दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यास उपचारादरम्यान तपासुन मृत घोषीत केले.

याप्रकरणी फिर्यादी नितीन प्रदीप मिश्रा वय २४ वर्ष रा. गजानन नगर, झोन चौक, हिंगणा, नागपूर यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे एम.आय.डी.सी येथे पोउपनि, सुरेन्द्र तिवारी यांनी ट्रक चालकाविरूध्द कलम २८१, १०६(१) भा.न्या. संहीता सहकलम १८४ मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल करून, पुढील तपास करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोस्टे काटोल अंतर्गत आगामी सण उत्सव मोहरम व आषाढी एकादशी सबंधाने शांतता समिती बैठक

Fri Jul 12 , 2024
काटोल :-दि. ११/०७/२०२४ रोजी पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामिण हर्ष पोद्दार, यांच्या अध्यक्षतेखाली आगामी येणाऱ्या मोहरम व आषाढी एकादशी निमित्याने पोलीस ठाणे काटोल हद्दीतील सर्व धर्मीय लोक, पोलीस पाटील व पत्रकार यांची एकत्रितरित्या सन उत्सव दरम्यान शांतता राखण्याबाबत पोलीस ठाणे काटोल च्या सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये पोलीस अधिक्षक यांनी लोकांच्या अडीअडचणी जाणुन घेवून सन उत्सवादरम्यान शांतता राखण्याबाबत समज दिली.तसेच काटोल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!