– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई
नागपूर :- दिनांक २१/०८/२०२३ रोजी पोलीस स्टेशन मौदा परीसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असता मुखबीरद्वारे खबर मिळली की १० चक्का ट्रक क्र. MH-४० / N७५९२ या वाहनाने काही इसम बेकायदेशीरपणे गोवंश यांना त्यांची चारा पाण्याची सोय न करता गाडी मध्ये कोंबून कत्तलीकरीता बडोदा शिवारातील मुरली ऍग्रो कंपनीच्या मागून नेऊन जात आहे, यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा बड़ोदा शिवारातील मुरली ऍग्रो कंपनीच्या मागे रोडवर नाकाबंदी करून ट्रक क्र. MH-४० / N७५९२ त्यास थांबविण्याचा इशारा केला असता पोलिसांना गणवेशात पाहून ट्रकच्या चालक व मालक हे अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून गेले.
घटनास्थळी ट्रक मध्ये एकूण १४ गोवंश किंमती १ लाख ७६ हजार रु. जनावरे क्रूरतेने कोंबून बांधुन क्लेशपणे वागणूक देवून त्यांची कोणत्याही प्रकारची चारापाण्याची व्यवस्था न करता वाहतुक करतांना मिळुन आले. १० चक्का ट्रक क्र. MH-४० / N-७५९२ किमती १५ लाख रु. वाहनासह असा एकूण किमती एकूण १६ लाख ७६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर जो मुद्देमाल व फरार चालक व मालक यांचे विरुद्ध कलम ११(१) प्राणि निर्दयतेने वागणुक प्रतिबंधक कायदा ५ (१) (A) महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करणेकामी पो.स्टे. मौदा यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) विशाल आनंद (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक अनील राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, नाना राऊत, इकबाल शेख, पोलीस नायक संजय बरोदीया, प्रमोद भोयर, वीरेंद्र नरड, चालक मोनू शुक्ला यांनी पार पाडली.