नागपूर :- वाडी पोलीसांनी जुगार सुरू असले बाबत मिळालेले खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन, पोलीस ठाणे हद्दीत आठवा मैल, आठवडी बाजार मागील ताडपत्रीचे झोपडीत, रेड कारवाई केली असता, त्याठिकाणी सट्टा-पट्टीवर आकडयाच्या नोंदी करून पैश्याची बाजी लावुन हार-जितचा जुगार खेळणारे ईसम १) प्रदीप गंगाधर रंगारी, वय ५० वर्षे, रा. एलॉट नं. ७७, राठी ले-आउट, वाडी, नागपूर २) अक्षय रोशन रामटेके, वय २४ वर्षे रा. सिध्दार्थ सोसायटी, आठवा मैल, नागपूर ३) शांतनू राजेन्द्र मोवाडे, वय २५ वर्षे, रा. महादेव नगर, लाव्हा, वाडी, नागपूर ४) प्रशांत रामकृष्ण जावडकर, वय ५२ वर्षे, रा. राठी ले-आउट, नागपूर ५) दिनेश अनिरूध्द चव्हाण, वय ३३ वर्षे, रा. हरीओम सोसायटी, दत्तवाडी, नागपूर ६) संदीप रमेश मनोहरे, वय ४२ वर्षे, रा. वार्ड नं. ५, आठवा मैल, नागपूर हे सर्व जुगार खेळतांना समक्ष मिळुन आले. आरोपींचे ताब्यातुन रोख ७,२२१/- रू., ०४ मोबाईल फोन, आकडयाच्या नोंदी असलेले चिठ्ठया व इतर साहित्य असा एकुण ४९,६३१/-रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. आरोपींविरूध्द पोलीस ठाणे वाडी येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी लोहीत मतानी, पोलीस उप आयुक्त (परि, क. १),सतिशकुमार गुरव सहा. पोलीस आयुक्त (एम.आय.डी.सी विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, राजेश तटकरे, पोउपनि, सतिश गुलवे, पोहवा, गजानन पवार, पोअं. दिगांबर, गौरव व मनोहर यांनी केली.