नागपूर :-अ) दिनांक १५.१२.२०२४ रोजी १४.०० वा. ते १६.०० वा. चे दरम्यान तगुन्हेशाखा सामाजीक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलीस ठाणे कळमणा हद्दीत मिकचर प्लांट समोर, व्ही.सी.ए ग्राऊंड कडे जाणाऱ्या रोडवर, कळमणा येथे एक अॅक्टीव्हा गाडी थांबवुन आरोपी नामे १) विशाल सतिश नागपाल वय २६ वर्षे, रा. किष्णा अपार्टमेंट, डिप्टी सिग्नल, कळमणा, नागपुर २) शुशील मधु राहाडाले वय २७ वर्ष रा. हिमाचल कॉलोनी, नाका नं. ५ मागे, कापसी, नागपूर हे त्यांचे ताब्यात शासनाने प्रतीबंधीत केलेला नायलॉन मांजा एकुण ५५ चकी विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगुन समक्ष मिळून आले. आरोपींचे ताब्यातुन मांजा, चक्री, अॅक्टीव्हा क. एम.एन ४९ ए.एक्स ४७५६ तसेच दोन मोबाईल फोन असा एकुण १,५२,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींचे कृत्य हे कलम ५. १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम-१९८६, सहकलम २२३ भा.न्या.सं. अन्वये होत असल्याने आरोपीविरुध्द पोलीस ठाणे कळमण्णा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
ब) दिनांक १५.१२.२०२४ चे २०.३० वा. चे सुमारास, पोलीस ठाणे पाचपावली पोलीसांनी त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलीस ठाणे हद्दीत लाडपूरा, प्लॉट नं. ६३२, येथे राहणारा आरोपी क. १) सुरज दिवाकर मंडलीक, वय १९ वर्षे, याचे राहते परी रेड कारवाई केली असता त्याचा साचिदार २) यश विलास डोळसकर वय २० वर्ष रा. मस्कासाथ, नागपूर यांचे ताब्यात शासनाने प्रत्तीबंधीत केलेला नायलॉन मांजा मोनो काइट फायटर लेबल असलेला एकुण ०८ नग चकी विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगुन समक्ष मिळुन आले. आरोपींचे ताब्यातुन नायलॉन मांजा चकी एकुण किंमती ८,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींचे कृत्य हे कलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, सहकलम २२३, ३(५) भा.न्या.सं. अन्वये होत असल्याने आरोपीविरूध्द पोलीस ठाणे पाचपावली येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा व पाचपावली पोलीसांनी केली.