वायुप्रदूषणाच्या जनजागृतीसाठी मनपातर्फे काढण्यात आली सायकल रॅली  

– मोठ्या संख्येत सायकलस्वारांचा सहभाग

चंद्रपूर :- केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत नागरीकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी आणि त्यादृष्टीने कृती करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दुचाकी इलेकट्रीक वाहन,सायकल रॅली व पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मनपा पार्कींग स्थळ येथे करण्यात आले होते.

‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवा’ (क्लीन एअर फॉर ब्लू स्काय) दिनानिमित्त आयोजीत या रॅलीत जवळपास २०० सायकलस्वार व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शहरातील गांधी चौक ते जटपुरा गेट ते मनपा कार्यालय या मार्गावर सायकल चालवत स्वच्छ पर्यावरणाचा संदेश दिला.दरवर्षी ७ सप्टेंबर रोजी इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काय दिवस साजरा करण्यात येतो.

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले की, राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत मनपातर्फे वृक्षारोपण,हिरवळ वाढविणे,पर्यावरणपुरक साधनांचा वापर करणे इत्यादी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने जे काही उपक्रम राबविण्याचे असतील ते सर्व मानपमार्फत राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले.

आयुक्त यांच्या हस्ते रॅलीस हिरवी झेंडी दाखवुन सुरवात करण्यात आली. यावेळी भवानजीभाई चव्हाण हायस्कुल, छोटुभाई पटेल हायस्कुल,जगन्नाथ बाबा विद्यालय,न्यू इंग्लीश हायस्कुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. मनपा आयुक्त व उपायुक्त यांनी देखील सायकल चालवुन पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला. पर्यावरणाचे महत्व अधोरेखीत करणारे पथनाट्य याप्रसंगी सादर करण्यात आले व रॅलीत सहभाग नोंदविल्याबद्दल जेष्ठ नागरीक, विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, मुख्यलेखाधिकारी मनोहर बागडे, शहर अभियंता महेश बारई तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

TRADERS VIEW G-20 SUMMIT AS A BOOSTER FOR INDIAN TRADE

Fri Sep 8 , 2023
Nagpur :- The G-20 Summit, one of its own kind international event being hosted at New Delhi, will open various better avenues for Indian trade and traders across the Country will anxiously await the decisions that will be taken at the Summit-said  Praveen Khandelwal, Secretary General of the Confederation of All India Traders (CAIT). We expect some strategic decisions on […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com