बारा चाकी ट्रक च्या धडकेने भीषण अपघातात 19 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू,दोन बालकासह एक महिला किरकोळ जख्मि

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी-नागपूर महामार्गावरील नवीन कामठी पोलिस स्टेशन जवळील वारीसपुरा मार्गावर कामठी हुन नागपूर कडे जात असलेल्या दुचाकीला मागेहून भरधाव वेगाने वाळू ने लादून भरलेल्या बारा चाकी ट्रक टिप्पर च्या चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार सह मागेहून बसलेले दोन बालके खाली पडून किरकोळ जख्मि झाले तर मागे बसलेली 19 वर्षोय तरुणी ट्रकच्या चाका खाली आल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी पाच दरम्यान घडली असून मृतक तरुणीचे नाव शबाना परवीन मो मिजान वय 19 वर्षे रा आंजरी मांजरी ,भिलगाव नागपूर असे आहे .तर सुदैवाने किरकोळ जख्मि होऊन बचावलेल्या दुचाकी चालक महिला आरिया मो अंजुम मो आरिफ वय 27 वर्षे रा आंजरी मांजरी ,तसेच मो दानिश मो आरिफ वय 7 वर्षे तसेच फलक अंजुम मो आरिफ वय 8 वर्षे रा आंजरी मांजरी असे आहे.घटना घडताच ट्रक चालकाने ट्रक सोडून पळ काढला होता मात्र पोलिसांनी पाठलाग करून आरोपी ट्रक चालकास अटक करण्यात यश गाठले असून अटक आरोपी ट्रक चालकाचे नाव रंजीत नेवारे वय 48 वर्षे रा बिना संगम कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार सदर अपघातातील जख्मि दुचाकी चालक महिला आरिया मो अंजुम मो आरिफ ही मृतक तरुणीची वहिनी असून दुचाकी क्र एम एच 40 बी जी 7569 ने कामठी रमानगर येथील नातेवाईक वंदना अरुण मेश्राम यांच्याकडे येऊन भेट देत राहत्या घरी आंजरी मांजरी ला जाण्यासाठी सदर घटनास्थळ मार्गे जात असता मागेहून येणाऱ्या ट्रक क्र एम एच 49 बी ओ 6606 च्या चालकाने जोरदार धडकेत दुचाकी चालक महिला सह इतर दोन बालके बचावले तर सदर तरुणी मृत्युमुखी पडली. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले तर मृतकेच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह कामठी च्या शासकीय उपजील्हा रुग्णलयात हलविण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का भारी बारिश के मद्देनजर प्रशासन, पुलिस, एसडीआरएफ, निकाय संस्थाओं को सतर्क रहने का निर्देश

Mon Jul 22 , 2024
– जनता की हरसंभव मदद की जानी चाहिए। – लोगों को मौसम विभाग की चेतावनी से अवगत कराया जाए। मुंबई :- भारतीय मौसम विज्ञान विभाग ने आज मुंबई और कोंकण के कुछ जिलों में भारी बारिश की चेतावनी दी है। वहीं कुछ अन्य जिलों में भी भारी बारिश की चेतावनी जारी की गई है। इस पृष्ठभूमि पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com