संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील वारेगाव रहिवासी 17 वर्षीय मुलाचा त्याच्या घराशेजारील घरात गेले असता त्या घरातील कुलरच्या विद्दूत धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गतरात्री 10 दरम्यान घडली असून मृतक मुलाचे नाव योगेश गुंनीलाल कागदीमेश्राम वय 17 वर्षे रा वारेगाव असे आहे.
सदर घटना घडताच उपचारार्थ आशा हॉस्पिटल येथे हलविण्यात आले.मात्र उपचारा दरम्यान सदर मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर मृतक मुलाच्या पार्थिवावर उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.सदर मृतकाच्या पाठीमागे आई,वडील व एक बहीण असा आप्तपरिवार आहे.