थकीत करामुळे ग्रामपंचायती झाल्या हतबल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 21:-शासनाने प्रत्येक स्तरावर कारभार करता यावा म्हणून प्रशासनाची विभागणी केली.तसेच ग्रामस्तरावर विकास करता यावा यासाठी ग्रामपंचायतीची निर्मिती केली आहे.या ग्रामपंचायतीला ग्रामस्थांकडुन केलेल्या कर वसुलीतून ग्रामविकासाचा आराखडा तयार करावा लागतोव.ग्रामस्थांकडून पाणी कर, घरपट्टीकर, दिवाबत्ती कर, आरोग्य कर आदी यासारखे कर वसुल करावे लागतात परंतु काही नागरिक कर भरण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने त्याचा परिणाम ग्रामविकासावर होत असून कामठी तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतीचा कर वसुलीचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे. अनेक ग्रामपंचायती कडे लाखो रूपयाची थकबाकी असल्याने या थकीत असलेल्या करामुळे ग्रामपंचायती नागरिकापुढे हतबल झाली आहेत .
या थकीत कराबाबत ग्रामपंचायतीने वारंवार सांगूनही ग्रामस्थ कर भरण्यास टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे गावातील विकास कामांना खीळ बसण्याचा प्रश्न उभा होतो .गाव विकासासाठी कर आवश्यक आहे.एकंदरीत गावाचा विकास करायचे म्हटले तर गावातील कर वसुली पूर्ण होणे आवश्यक आहे तरच वसुल झालेंल्या करातून गावात विविध सुधारणा करता येतात .नविन रस्ते, नाली, दिवाबत्ती , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य विषयी, विविध सुविधा गावात उपलब्ध करता येतात त्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन कराचा भरण्यावर जोर द्यावा, जेणेकरून गावात विकासकामे करता येतील असे आव्हान ग्रामपंचायतीच्या वतीने कापसी ग्रा प चे सरपंच शेषराव आडोळे आदी सरपंचांनी केले आहे.
बॉक्स:-थकीत करामुळे ग्रामविकासास एक प्रकारची खीळ बसते त्यामुळे ग्रामस्थांनी थकीत कर भरण्यासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून वसुल झालेल्या करातून ग्रामविकासाचा आराखडा आखून गावात विविध विकास कामे करता येतात.
शेषराव आडोळे
सरपंच, कापसी ग्रामपंचायत

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अनाज माफिया पर कारवाई

Sat May 21 , 2022
नागपूर – हनुमान नगर के गणेश धन्य भंडार मालक केशरवानी की दूकान से सरकारी गेहूं बुलेरो पिकप एमएच 49 एटी 9125 में भरकर कलमना मार्केट में बेचने के लिए लेजाया गया। यह काम अनाज माफिया  कुंदवानी द्वारा किया गया है। वरिष्ठ अधिकारियों के आदेश पर क्राइम ब्रांच के यूनिट 5 द्वारा करवाई की गई है। कलमना पुलिस स्टेशन के अधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com