नागपूर :-महाराष्ट्रात काँग्रेस व भाजपने सरकारच्या माध्यमातून जातीयवाद पोसून भांडवलशाही उभी केली, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करून दलित, शोषित, गरीब, मजदूर, बेरोजगार यांना नोकरी पासून वंचित ठेवले. हेच धोरण केंद्रानेही राबविले, म्हणून 2024 ला होणाऱ्या निवडणुकीत राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारला सत्तेवरून पाय उतार करावे व फुले शाहू आंबेडकरी विचारांचे सरकार बनवावे, असे आवाहन बसपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंदकुमार यांनी आज केले.
आज बसपाने रेशीमबागच्या सुरेश भट सभागृहात विदर्भ स्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. नेहमीप्रमाणे भगवा असलेला एरिया आज संपूर्ण निळा दिसत होता, नागपूर च्या रेशीमबागेतून व दीक्षाभूमीतून निळे वादळ घोंगावायला सुरुवात झालेली आहे.
बसपाचे नॅशनल कोऑर्डीनेटर अशोक सिद्धार्थ यांनी बाबासाहेबांचे संविधानिक व आरक्षण धोरण अमलात आणायचे असेल, महापुरुषांचे मिशन पूर्ण करायचे तर बहुजनांनी बसपा ला साथ द्यावी असे आवाहन केले. याप्रसंगी राष्ट्रीय कॉर्डिनेटर व प्रदेश प्रभारी नितीन सिंग, प्रदेश अध्यक्ष एड संदीप ताजने यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदेश प्रभारी एड सुनील डोंगरे यांनी तर समारोप जिल्हाध्यक्ष ओपुल यांनी केला.
कार्यक्रमानंतर बसपा नेत्यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दीक्षाभूमी वरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देऊन त्रिशरण पंचशील ग्रहण केले.
मंचावर महाराष्ट्र प्रदेश महासचिव नागोराव जयकर, नानाजी देवगडे, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, राजू भांगे, विजयकुमार डहाट,चंद्रकांत मांझी, अविनाश वानखेडे, सुशील वासनिक, शंभरकर, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष जय मेश्राम, दिनेश गेडाम, शंकर बोरकुट, मोहन राईकवर, प्रेम मनोहर, गुणवंत गणवीर, इंगळे, मुकद्दर मेश्राम, शहराध्यक्ष शादाब खान तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यातून आलेले प्रदेश सचिव, जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.