संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – टेका नाका नागपुर येथुन कन्हान नदी पात्रात दोघे भाऊ धार्मिक ग्रंथ, पुस्तके विसर्जन करण्यास आलेल्या दोन भावा पैकी आमिर रज्जा मो. बशीर शेख चा पाय घसरून संतुलन बिघडुन पाण्यात वाहत जावुन खोल पाण्यात बुडुन त्याचा मुत्यु झाला.
मंगळवार (दि.१७) मे २०२२ ला सकाळी ७ वाजता ताज नगर टेका नांका नागपुर येथुन दोघे भाऊ कन्हान नदी पात्राच्या सत्रापुर कालीघाट शिवारातील खंडेलवाल कंपनी च्या पाण्याच्या ढोल्याजवळ धार्मिक ग्रंथ व पुस्तके विसर्जन करण्यास आले होते. धार्मिक ग्रंथ व पुस्तके नदी पात्रात विसर्जन केल्यावर नदीत आंघोळ करण्याचा मोह टाळु न शकल्याने आंघोळ करण्यास पाण्यात उतरले असता एका भावाचा पाय घसरून संतुलन बिघडुन नदी पात्रात वाहत खोल पाण्यात जाऊन आमिर रजा मोहम्मद बशीर शेख वय २७ वर्ष राह. ताज नगर टेका नाका नागपुर यांचा पाण्यात बुडुन मुत्यु झाला. तर दुसरा भाऊ अकरम रजा वल्द मो बशीर शेख वाचविण्यास गेला असता त्यास सुचेनाचे झाल्याने तो किणा-याला लागल्याने वाचला. घटनेची माहीती कन्हान पोलीसाना मिळताच घटनास्थळी पोहचुन बुडालेल्या युवकाचा कोळी बांधवा व्दारे नदी पात्रात शोध घेतला असता दुपारी १२ वाजता दरम्यान आमिर चा मुत्युदेह मिळाल्याने कन्हान पोलीस स्टेशनचे हे कॉ मोहन शेळके, विरेंद्र चौधरी हयानी कामठी ग्रामिण उपजिल्हा रूग्णालयात नेऊन शवविच्छेदन करून त्याच्या नातेवाईकाना मुत्युदेह सोपविण्यात येऊन कन्हान पोस्टे ला मर्ग दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.