12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करा

मनपा प्रशासक तथा आयुक्त राजेश मोहिते यांचे आवाहन
चंद्रपूर – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मार्फतीने चंद्रपूर शहरातील 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असून, संभाव्य चौथी लाट थोपवून धरण्यासाठी लस घेण्याचे आवाहन मनपा प्रशासक तथा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मार्फतीने चंद्रपूर शहरातील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 2, रामनगर येथे 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे कोर्बेव्हॅक्स लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. या लसीचे 2 डोस 28 दिवसांच्‍या अंतराने देण्‍यात येत आहे. विविध शाळा महाविद्यालयांमध्येही लस देण्यात येणार असल्याने पालकांनी शाळेत संपर्क साधावा. १५-१७ वर्ष वयोगटातील मुलांना शहरातील मनपाच्या सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी लस घेण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बंद टोल नाक्यावर टिप्पर ट्रक ची दुचाकी ला धडक, उपचारार्थ एकाचा मुत्यु

Mon May 16 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी उपचारा दरम्यान दुचाकी सवारचा मृत्यु. ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत बंद टोल नाक्या जवळ टेकाडी शिवारात टिप्पर ट्रक चालकाने दुचाकी वाहन चालकाला समोरून धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी सवार गंभीर जख्मी झाल्याने त्यास मेडिकल कॉलेज नागपुर येथे उपचाराकरिता दाखल केले असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी टिप्पर ट्रक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!