संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
पिकअप वाहन व ५ टन कोळसा ५ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाला मिळालेल्या गुप्त माहीती वरून वेकोलि सुरक्षा अधिकारी सह धाड मारून वेकोलि कामठी प्रतिबंधक क्षेत्र कांद्री शिवारातील झाडी झुडपीत कोळसा खदानचा चोरीचा कोळसाचा साठा करून पिकअप वाहनात भरताना पकडुन पिकअप वाहन व ५ टन कोळसा असा ५ लाख ६० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोस्टे ला आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून एक आरोपी अटक करित पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे. मात्र या कार्यवाहित एक जप्त ट्रक सोडला असल्याच्या चर्चेला उधाण असून स्थानिक गुन्हे शाखायांच्या कार्यवाहिवर शंका व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकास मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहीती वरून कन्हान पोलीस स्टेशन च्या पश्चिमेस ५ कि मी अंतरा वरील कांद्री शिवारात झाडी झुडपी च्या मागे कोळसा चोरीच्या कोळसा साठवुन वेकोलि कोळसा खदान प्रतिबंधक क्षेत्रात लपवुन ठेवल्याच्या माहीतीने स्थागु अशा नागपुर ग्रामिण पथकाने शुक्रवार (दि.१३) ला पहाटे सकाळी २.३० ते ३ वाजता दरम्यान वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी रविकांत रामदास कंडे यांचे सह घटनास्थळी धाड मारली असता अब्दुल फारूख अब्दुला शेख यांनी कामठी खुली कोळसा खदान चा चोरी केलेला कोळसा कांद्री झाडी झुडपी मागे साठवु न २०७ पिकअप वाहन क्र एम एच २१ एक्स १८५६ मध्ये कोळसा भरताना पकडले असता तेथील इतर आरोपी पसार झाले. सुरक्षा अधिकारी रविकांत कडे यांनी इंदर खुली खदान मधुन ट्रक आणि पे लोडरच्या मदतीने कोळसा ट्रक मध्ये भरून खदान च्या वजन काट्यावर वजन केले असता ५ टन कोळसा खदान मध्ये जमा करण्यात आला. व पिकअप वाहन ५ लाख व कोळसा ६० हजार रूपये असा एकुण ५ लाख ६० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून स्थागुअशा नाग पुर ग्रामिण पथकाने कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधि न करून फिर्यादी रमाकांत कंडे सुरक्षा अधिकारी च्या तोंडी तक्रारीवरून कन्हान पोलीसानी आरोपी अब्दुल फारूख अब्दुला शेख विरुद्ध अप. क्र २८३ /२०२२ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून अटक करित पुढील तपास कन्हान पोस्टे चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाचे उपपोनि अनिल राऊत, हे कॉ नाना राऊत, काळे, प्रणय बनाफर, विरू आणि वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे हयानी शिताफितीने यशस्विरित्या पार पाडली.