संदीप कांबळे,कामठी
कन्हान : – तारसा रोड चौक कन्हान येथे एका चांगल्या घरच्या मुकबधीर महिलेला एका दुचाकीवर आणुन सोडुन दिलेल्या महिलेल्या ऑटो चालकांनी तिच्या घरच्या मंडळीना शोधले परंतु तिचा पत्ता न लागल्याने कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधिन केल्या ने पोलीसानी तिच्या घरच्याचा दोन दिवस शोध घेऊन यश न आल्याने तिला नागपुर मधिल आश्रमात कुठेही आधार न मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ता बाळा मेश्राम हयानी पुढाकार घेत हितज्योती आधार फाउंडे शन सावनेर चे हितेश बन्सोड सी संपर्क करून या मुकबधीर महिलेच्या पुनर्वसना करिता आधार मिळवुन दिला.
” मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदती चा हाथ द्या. ” या ब्रिद वाक्याचे अनुकरण करण्या करिता सावनेर येथील हितज्योती आधार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष हितेश बन्सोड हयानी मागील चार वर्षा पासुन सेवाभावी कार्य करित रोडवरील निराधार, अनाथ, अपंग, बेवारस मृतदेहाचे अंतिम संस्कार करने, रस्त्यावर फिरणारे मानसिक मनोरुग्ण असलेल्या व्यक तीचे पुनर्वसन करने, रस्त्यावरील अपघात ग्रस्ताना मदत करणे, याकामासाठी अग्रेसर भुमिका पार पाडत किती तरी अंत्यत गरजुना मदतीचा हाथ व आधार देत त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधिन केले.
ज्याचे कुणीच नाही अश्याना वेगवेगळया आश्रमात दाखल करून त्याचे पुनर्वसन केले आहे. आता पर्यत कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत दोन महिला व एका पुरूषाचे हितज्यो ती फाऊडेशन सावनेर चे हितेश बन्सोड हयानी पुनर्व सन केले असुन या चौथ्या मुकबधीर महिलेचे सुध्दा पुनर्वसनाचा पर्यंत करित आहे.
ममतेचे काळीज शुन्य एका युवकाने या मुकबधीर महिलेला सोमवार (दि.२५) एप्रिल ला सकाळी ८.१५ वाजता दुचाकीने आणुन तारसा रोड चौकात सोडुन निघुन गेला. तेथील ऑटो चालकाना ती हाथ देऊ लाग ल्याने तिला कुठे जायचे विचारले असता ती मुकबधीर असल्याने काहीच सागु शकली नाही. बबलु नावाच्या ऑटो चालकांनी तिला चाय बिस्कीट चारून तिला ऑटोने इंदिरा नगर, शिवनगर, गहुहिवरा रोड या कन्हा न परिसरात फिरविले परंतु पत्ता न लागल्याने सामाजि क कार्यकर्ता बाळा (रंजनिश) मेश्राम ला बोलावुन कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधिन करण्यात आले. कन्हान पोलीसानी सुध्दा सतत तीन दिवस तारसा, निमखेडा, खेडी, खोपडी परिसरात फिरवुन पाहीले परंतु तिच्या नातेवाईकाचा पत्ता न लागल्याने नागपुर येथील आश्रमात नेऊन पाहीले तेथेही आधार न मिळा ल्याने. बाळा मेश्राम हयानी हितेश बन्सोड शी संपर्क करून कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनात पोलीस वाहनाने पोलीस हवालदार सुधिर चव्हाण, बाळा मेश्राम, पत्रकार मोतीराम रहाटे, ऋृषभ बावनकर, वाहन चालक यांनी गुरूवार (दि.२८) एप्रिल ला रात्री १ वाजता सावनेर ला नेऊन हितज्योती फाऊं डेशनचे हितेश बन्सोड च्या स्वाधिन मुकबधीर महिलेस करण्यात आले. ते सुध्दा सोसल मिडीया च्या माध्यमा तुन मुक बधीर महिलेच्या कुंटुबियाचा शोध करित आहे. परंतु आता पर्यंत थांगपत्ता लागला नसल्याने यवतमाळ, बुलढाणा येथील किंवा मिळे त्या आश्रमात जागा मिळाल्यास या मुकबधिर महिलेचे पुनर्वसन करण्याचा जोमाने पर्यंत हितेश बन्सोड करित आहे. या मुकबधिर महिलेस कुणीही ओळखत असल्यास त्यानी सावनेर चे हितेश बन्सोड यांच्या मो नंबर ७८८८१६१६३३ वर संपर्क करून सहकार्य करावे.