संदीप कांबळे, कामठी
दोन आरोपीस अटक ,तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
कामठी ता प्र 21:- विनापरवाना अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारी गाडी नवीन कामठी पोलिसांनी रनाळा – भिलगाव मार्गावर पकडून अकरा गोवंश जनावरांना जीवदान देऊन तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई बुधवारी सकाळी आठ वाजता सुमारास केली . नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अनास रजा शेख करीम वय 25 राहणार पिवळी नदी नागपूर ,शेख नईम अली मुक्तार अली वय 24 राहणार मांजरी पिवळी नदी नागपूर यांनी टाटा मालवाहू गाडी क्रमांक एम एच 49 एटी 4908 मध्ये 11 जनावरे भरून विनापरवाना अवैधरित्या कामठी वरून रणाळा – भिलगाव मार्गे नागपूर कडे घेऊन जात असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर नवीन कामठी पोलिसांनी रनाळा शिवारात गाडी थांबवून चौकशी केली असता गाडीमध्ये अकरा जनावरे निर्दयतेनी बांधून कोंबलेले दिसून आले. जनावर भरलेली गाडी नवीन कामठी पोलीस स्टेशनला आणून आरोपी विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 11 (1) ( क)( ड )व मोटार वाहन कायदा 177 सहकलम 34 , 109 भादवी नुसार गुन्हा दाखल करून आरोपी अनास रजा शेख करीम व शेख नईम अली मुख्तार अली यांचे विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली त्यांच्या जवळून अकरा जनावराची किंमत 1,लाख 35 हजार व गाडीची किंमत एक लाख 65 हजार एकूण 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जप्त केलेली सर्व जनावरे नवीन कामठी येथील गोरक्षण केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आले आहे . ही यशस्वी कारवाई पोलिस उपनिरीक्षक श्याम वारंगे, संदीप सगणे ,सुरेंद्र शेंडे ,अनिकेत साखरे ,कमल कनोजिया, एस शुक्ला यांच्या पथकाने केली.
पोलिसांनी दिले अकरा गोवंश जनावरांना जीवदान
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com