संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 5:- कांग्रेस सेवादल चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजकुमार गेडाम यांच्या लहान सुनेने विषारी औषध खाऊन आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी 2 वाजेदरम्यान घडली असून मृतक विवाहित तरुणीचे नाव नीता तुषार गेडाम वय 30 वर्षे रा जे पी नगर कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक तरुणी एक वर्षाच्या कालावधीतच विवाहबद्ध झाली असून सासर च्या घरी न राहता हे दोघेही पती पत्नी जे पी नगर येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते.काल 4 एप्रिल ला दुपारी 2 दरम्यान अज्ञात कारणावरून विषारी औषध खाऊन खाल्ल्याची घटना घडताच उपचारार्थ त्वरित शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र परिस्थिती नाजूक असल्याने पुढील उपचारार्थ नागपूर येथील मेयो इस्पितळात हलविण्यात आले.तर रुग्णालयात उपचारादरम्यान सदर तरुणी मरण पावली.मृतक तरुणीच्या पार्थिवावर मेयो हॉस्पिटल येथे शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.मृतक तरुणीच्या पाठीमागे आई, वडील व तीन बहिणी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे
कांग्रेस सेवादल महाराष्ट्र प्रदेश सहसचिवाच्या सुनेची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com