नागरी सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्णांसाठी अभिरुख मुलाखत प्रशिक्षण

नागपूर, दि. 30: संघ लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2021-22 चा निकाल दि. 17 मार्च 2022 रोजी घोषित झालेला आहे. मुख्य परीक्षेत उर्त्तीण होवून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने अभिरुख मुलाखत प्रशिक्षण-2022 कार्यक्रमाचे राज्य शासनाद्वारे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांसाठी दिल्ली येथे जुने महाराष्ट्र सदन, कोपरनिकस मार्ग, मंडी हाऊस जवळ, नवी दिल्ली येथे अभिरुख मुलाखत सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन भारतीय प्रशाकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था नागपूरचे संचालक डॉ. प्रमोद लाखे  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले.

            यावर्षी अभिरुख मुलाखती दि. 3 एप्रिल ते 15 मे 2022 दरम्यान येणाऱ्या प्रत्येक शनिवार व रविवारी घेतले जाईल. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी भारतीय प्रशाकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था नागपूरचे संचालक डॉ. प्रमोद कमलाकर लाखे यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

            महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी www.iasnagpur.com तथा www.siac.org.in या संकेतस्थळावरील सविस्तर सूचना पहावी.

            अधिक माहितीसाठी directoriasngp@gmail.com या ई-मेलवर चौकशी करावी. तसेच दूरध्वनी क्रमांक 0712-2565626, भ्रमणध्वनी क्रमांक 9960936237 व 9422109168 यावर संपर्क साधावा.

            मुलाखती संदर्भात प्रवेश अर्ज जुने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथील मुलाखत केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यासाठी उमेदवारांनी मुलाखतीस येताना डीएएफ (Detailed Application Form) च्या सहा छायांकीत प्रती, युपीएससीचे मुलाखत पत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो  आदी कागदपत्रे सोबत आणावीत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक पिशवीचा वापर करण्यावर कारवाई

Thu Mar 31 , 2022
नागपूर : नागपूर महानगरपालिकेने बुधवारी (ता.३०) स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आशीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने आशीनगर झोन अंतर्गत सिध्दार्थ नगर येथील श्री डेअरी या दुकानांवर प्लास्टिक  पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.           त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत गणेशपेठ बस स्टँड जवळील धीरज बरगट असोसिएट यांच्याविरूध्द रस्त्यालगत असलेल्या झाडावर बॅनर आणि फलक लावल्याबद्दल कारवाई करून ५  हजार रुपयांचा दंड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com