संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 30 :- समाजाच्या न्याय हक्कासाठी सदैव लढा देणारे वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर आमदार संतोष बांगर यांनी एका कार्यक्रमात 1000 कोटी रुपये घेतल्याचा बिनबुडाचा आरोप केला आहे.आमदार संतोष बांगर यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील प्रकाश उर्फ़ बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपामुळे देशातील आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवल्या आहेत .या बिनबुडाच्या आरोपाच्या वक्तवाच्या निषेध करीत आमदार संतोष बांगर यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची प्रसार माध्यमासमोर जाहीर माफी मागावी व आमदार संतोष बांगर यांचा आमदारकीचा राजीनामा घेण्यात यावा या मागणीसह वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागपूर जिल्हा उपाध्यक्ष नरेश वाघमारे यांच्या नेतृत्वात तहसिलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सामूहिक निवेदन देण्यात आले.
हे निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष नरेश वाघमारे,प्रशांत नगरकर, अविनाश गजभिये,अजय मेश्राम, राजेश ढोके, रवी वानखेडे,योगेश वाळके,सुमेध गेडाम आदी उपस्थित होते.
वंचित तर्फे आमदार संतोष बांगर च्या वक्तव्याचा निषेधार्थ तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याना सामूहिक निवेदन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com