रामटेक – प्रिशा फाऊंडेशन तर्फे आयोजीत व रोलर स्पोर्ट कोचेस असोसिएशन नागपूर यांच्या सहकार्याने 27 फेब्रुवारी ला एन. आय. टी. इंटरनॅशनल स्केटिंग रिंग नागपूर येथे विदर्भ स्तरीय इंविटेशनल स्पीड स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संपूर्ण विदर्भातील 350 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये आर.एन. स्पोर्ट क्लब रामटेक च्या खेळाडूंनी यश प्राप्त केले आहे. त्यांनी या स्पर्धेत आपापल्या वयोगटात व श्रेणीमध्ये एकुण 15 पदके प्राप्त केली आहेत. यामध्ये बिगणर श्रेणीत सुवर्ण पदक गौरी तांदुळकर, गार्गी कारेमोरे, मधुरा बिगमोरे तर रजत पदक कौस्तुभ महाजन, प्रत्यक्ष सोलंकी, अंशुल शहारे, शिवम डोंगरे, तनिषा रॉय, नव्या जिवतोडे, वैभवी गोंनाडे, स्वरा कुर्वे, तसेच हायपर/कवार्ड या श्रेणीत कांस्य पदक अद्वेत चांदेकर, राजण्या किंमतकर, त्रिशा पराते, कल्पिता नारनवरे यांनी प्राप्त केले. सर्व विजेत्या खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक रवींद्र नारनवरे व देवानंद कामठे सर यांना दिले.
पुन्हा एकदा रामटेक च्या आर. एन. स्केटिंग ग्रुप चे नामांकन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com