नागपूर :- रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर येथील मोलेक्युलर बायोलोजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग विभाग, धरमपेठ एम. पी. देव स्मृती विज्ञान महाविद्यालय, हिस्लॉप कॉलेज,नागपूर आणि सेंट फ्रान्सिस डी सेल्स कॉलेज, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेज कनेक्ट प्रोग्राम अंतर्गत सदर कार्यशाळेचे आयोजन नुकतेच जागतिक जल दिनी केल्या गेले. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानविषयी प्रत्यक्ष माहिती व्हावी आणि भविष्यात त्यांच्या करिअर घडवीतांना मदत व्हावी या प्रमुख उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केल्या गेले होते.
डॉ. राजेंद्र काकडे, माजी प्र-कुलगुरू, नागपूर विद्यापीठ हे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष होते. प्रसंगी डॉ. नितीन डोंगरवार, डॉ. दयानंद गोगले, डॉ. महेंद्र घागरे, संस्थापक, पर्यावरण संघटना, ‘हरित मित्र परिवार’ प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यशाळेत आधुनिक जैविक संशोधनात ऊती संवर्धन आणि जिवशास्त्रातील विशेष तंत्रांसाठी सहभागींना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नागपूर विद्यापीठ क्षेत्रातील १४ नामांकित संस्थांमधील ९० हून अधिक सहभागी कार्यशाळेला उपस्थित होते. डॉ. माधुरी ठाकरे,
सुदीप्ता सरकार, रुची वासनिक, डॉ. स्वाती गोडघाटे, अमोल पिंपळशेंडे, डॉ. प्रज्ञा अनासाने, नेहा चौधरी आणि डॉ. यशवंत भोरगे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी मोलाचे सहकार्य केले.
समारोप सत्रात, डॉ. प्रशांत माहेश्वरी, डीन, विज्ञान-तंत्रज्ञान विद्याशाखा आणि डॉ. स्मिता आचार्य, आयक्यूएसी संचालक, नागपूर विद्यापीठ अनुक्रमे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाहुण्यांनी कार्यक्रमाच्या विशिष्टतेचे कौतुक केले आणि विद्यापीठात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन केले. कार्यशाळेत कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले जे नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाचा घटक आहे.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. मौसमी भोवल यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निखत नकवी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. पितांबर हुमणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी डॉ. शिवानी डोंगरवार, डॉ. परमा मुजुमदार, डॉ. मयंक वरुण, डॉ. सारिका गुरा, डॉ. चंद्रकुमार पटले आणि प्रा. दर्शना शिंगणे यांनी परिश्रम घेतले. अशा प्रकारच्या कार्यशाळा वेळोवेळी आयोजित करण्यात याव्यात अशी मते अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.