यवतमाळ :- नेहरू युवा केंद्र यवतमाळच्यावतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, गोळाफेक व शंभर मीटर धावणे आदी क्रीडा प्रकारांचा समावेश होता. स्पर्धेत कळंब, पांढरकवडा, यवतमाळ, पुसद व दिग्रस या तालुक्यांतील स्पर्धकांनी भाग घेतला.
कार्यक्रमाला अभिजित पवार, अनिल ढेंगे, अविनाश जोशी, अविनाश चव्हाण, पराग जोशी उपस्थित होते. अविनाश जोशी यांनी माणसाच्या जीवनात खेळाचे महत्त्व सांगून खेळामुळे सहकार भावना वाढीस लागत असल्याचे सांगितले. सुवर्णयुग क्रीडा मंडळ यवतमाळ संघाने कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक सोल्जर अकॅडमी यवतमाळ तसेच युवा पलटण क्रीडा मंडळ पुसद यांनी तृतीय क्रमांक पटकावला. खो-खो मध्ये प्रथम क्रमांक क्रीडा भारती क्रीडा मंडळ यवतमाळ, द्वितीय क्रमांक नवजयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ तर राणी लक्ष्मीबाई क्रीडा मंडळ कळंब यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
100 मीटर रनिंगमध्ये राजू सुनील उईके प्रथम क्रमांक, आदित्य सुभाष येल्ले द्वितीय, रोहित विजय चव्हाण तृतीय, गोळा फेकमध्ये आकाश हरिश्चंद्र राठोड प्रथम क्रमांक, शंकर भास्कर डुकरे द्वितीय, वैभव गणेश राठोड तृतीय, महिला 100 मीटर रनिंगमध्ये भूमिका गणेश कोडपकवार प्रथम क्रमांक, कोमल राजेंद्र मडावी द्वितीय क्रमांक, कोमल अमरसिंग बैस यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
गोळा फेकमध्ये प्रियंका शामराव बोलके प्रथम क्रमांक, प्रतीक्षा मनोहर बगाडे द्वितीय, पायल संदीप येवले यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कबड्डी स्पर्धेसाठी पंच म्हणून अभिजीत पवार, संजय पदीलवार, महेश लेंडाळे, खो-खो साठी अविनाश जोशी पंच होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम व अनिल ढंगे तसेच नेहरू युवा केंद्राचे रवी शेळके, मनिष आडे यांनी परिश्रम घेतले.