महानगरपालिका, नागपूर शहर क्षयरोग नियंत्रण सोसायटी, “क्षयरुग्ण शोध मोहिम (ACF) दि. 08/03/2023 ते 21/03/2023 राबविण्यात येत आहे.

नागपूर :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत नागपूर शहरात क्षयरुग्ण शोध (ACF) मोहिम दि. 08/03/2023 ते 21/03/2023 या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. या संदर्भात सहसंचालक, आरोग्य सेवा कुष्ठरोग व क्षयरोग, पुणे यांच्याकडुन हि मोहिम राबविण्याच्या सुचना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने या अभियानामध्ये महानगरपालिका आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामधिल सर्व नागरी आरोग्य केंद्र व हेल्थ पोस्ट यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच नागपूर शहराच्या कार्यक्षेत्रातील स्लम पापुलेशन घेण्याचे ठरलेले आहे. रोगशास्त्रीय अभ्यासानुसार क्षय आजाराचे रुग्ण निदान व औषधोपचारापासुन वंचीत राहील्यास रुग्णाला या रोगापासुन निर्माण होणा-या गुंतागुंतीचा सामना तर करावाच लागतो त्याचप्रमाणे त्याच्या सहवासातील ईतर लोकांना सुध्दा या आजारांचा धोका संभवितो. म्हणुन समाजातील सर्व क्षयरुग्ण शोध घेवुन औषधोपचार चालु करणे हे या मोहिमेचे उददेश आहे. म्हणुन सदर मोहिम मनपा कार्यक्षेत्रात अतिजोखिम ग्रस्त लोकसंख्येत (उदा. झोपडपटटी, विटाभटटी, भटक्या जमाती, कामासाठी स्थलांतरीत तसेच खाणीमध्ये काम करणारे कामगार, बेगर इ. सामाजिक गट तसेच तुरुंग, वृध्दाश्रम, आश्रमशाळा व वस्तीगृह, आदीवासी मुलांचे वसतीगृह, मनोरुग्णालय इ.) ठिकाणी ही मोहीम आपल्या शहरात राबविण्यात येत आहे. सदर लोकसंख्या ही एकुण लोकसंख्येच्या किमान दहा टक्के पर्यंत घेण्यात आलेली आहे. या मोहिमेअंतर्गत आशा स्वयंसेविका त्या भागातील घरोघरी भेट देवुन या आजारांच्या लक्षणांची माहिती देणार आहे व आजाराने ग्रसित असतील तर त्यांना पुर्णपणे माहिती देण्यात सहकार्य करावे व या मोहिमेचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन राम जोशी, अपर आयुक्त, म.न.पा., नागपूर, डॉ. नरेंद्र बहिरवार, वैद्यकिय आरोग्य अधिकारी, म.न.पा., नागपूर, डॉ. विजय जोशी, अति. वैद्यकिय आरोग्य अधिकारी, म.न.पा., नागपूर व डॉ. शिल्पा जिचकार, शहर क्षयरोग अधिकारी, म.न.पा. नागपूर व डॉ. सरला लाड, नोडल अधिकारी, आर.सी.एच. म.न.पा. नागपूर यांनी केलेले आहे.

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

Sat Mar 11 , 2023
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.10) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com