– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 27 :- कन्हान पुलिया मार्गावर डबलसीट जात असलेले दुचाकी क्र एम एच 40 ए एच 4266 च्या चालकाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात कार ने दिलेल्या जोरदार धडकेतून घडलेल्या गंभीर अपघातात दुचाकीस्वार व सहपाठी असे दोन तरुण गंभीर जख्मि झाल्याची घटना आज सकाळी 11 दरम्यान घडली. जख्मि चे नाव सोनू तायडे वय 26 वर्षे व आशिष ठाकूर वय 20 वर्षे असे आहे.
सदर जख्मि तरुणांना कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता जख्मिची परिस्थितीत नाजूक असल्याने पुढील उपचारार्थ नागपूर च्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
कार दुचाकी अपघातात दोन तरुण गंभीर जख्मि
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com