नागपूर :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल अनेक पक्ष, संघटना आणि नागरिकांनी जाहीर निषेध नोंदवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून सामाजिक न्याय, समता, आणि बंधुतेसाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जर कोणत्याही वक्तव्यात डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा अपमान किंवा त्यांचे योगदान कमी लेखण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते निंदनीय मानले जाते. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला आदर देणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या व्यक्तव्याच्या जाहीर निषेध करीत आहोत . त्यांनी भारतीय जनतेची जाहीर माफी मागावी. किशोर कन्हेरे उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, श्याम चौधरी, राजेश रंगारी, रमेश गिरडकर, देवेंद्र काटे, राहुल पलांडे, विजय शेंडे, क्रांति ढोक, प्रमोद सातपुते, पुरुषोत्तम वाडीघरे, शैलेश मानकर, समिर वानखेडे, किशोर गायधने, यांनी निषेध केला.