‘पौर्णिमा दिवस’ निमित्त देव नगर चौकामध्ये जनजागृती

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या वतीने ‘पौर्णिमा दिवस’ अभियानाद्वारे मंगळवारी (ता.१७) देव नगर चौक परिसरात जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, पिनाकी बानीक आदींनी जनजागृती केली.

स्वयंसेवकांनी व्यापारी बांधवांना अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले त्याला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. याप्रसंगी मनपाच्या विद्युत विभागाचे विप्लव भगत उपस्थित होते.

या अभियानाला देव नगर चौक परिसरातील व्यावसायिक, दुकानदार, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जनजागृती दरम्यान स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाविद्यालयांसाठी मनपाची बेस्ट फ्रॉम वेस्ट स्पर्धा

Wed Dec 18 , 2024
– विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देण्यास उपक्रम – टाकाऊ बनणार आकर्षक टिकाऊ वस्तू चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे माझी वसुंधरा आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातील सर्व महाविद्यालयांसाठी टाकाऊपासून टिकाऊ (बेस्ट फ्रॉम वेस्ट) स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या कल्पनेतुन आयोजीत करण्यात आलेल्या या स्पर्धेत तंत्रशिक्षण संस्था, इंजिनिअरिंग कॉलेजेस, पॉलीटेक्निक कॉलेज, आयटीआय व इतर संस्थाना यात सहभागी करून घेण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!