नागपूर :-फिर्यादी कृष्णा नत्थुजी उईके वय २७ वर्ष रा. इंदिरा माता नगर, विशाखा शाळेच्या मागे, बिनाको मंगळवारी, नागपूर है फर्निचर बनविण्याचे काम करतात, त्यांनी दिनांक ०६.१२.२०२४ चे ११.३० वा. चे सुमारास, पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत मुंजे चौक, मेट्रो स्टेशनच्या बाजुला सॅमसंग गॅलेक्सी दुकाना समोर त्यांची होन्डा शाईन क. एम.एच ४९ ए.एक्स ११८३ किंमती अंदाजे ५०,०००/- रू. ची पार्क करून, काम करण्याकरीता गेले असता, कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीची गाडी चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे सिताबर्डी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात सिताबर्डी पोलीसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आरोपी नामे रोहीत सुभाष नेहारे वय २४ वर्ष रा. प्लॉट नं. २७/अ, साईनगर, दाते ले-आउट, जयताळा रोड, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याचे सांगीतले. आरोपीस अटक करून त्याची सखोल विचारपूस केली असता, त्याने वरील गुन्हयाव्यतीरिक्त पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीतुन दिनांक ०८.१२.२०२४ चे १४.०० ते १८.०० वा. चे दरम्यान प्लॉट नं. २९, धरमपेठ, आदित्य होन्डा शोरूम जवळुन ०१ ग्रे रंगाची अॅक्टीव्हा मोपड क. एम. एच ३१ एफ. डी १८७४ चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन दोन्ही वाहने किंमती एकूण ९५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, प्रमोद शेवाळे अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) नागपूर शहर, राहुल मदने, पोलीस उप आयुक्त (परि. कं. २), सुधीर नंदनवार, सहा. पोलीस आयुक्त (सिताबर्डी विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, चंद्रशेखर चकाटे, पोनि. विनोद गायकवाड (गुन्हे), पोउपनि, जगननाथ शेरकर, पोहवा. नंदनकिशोर वालदे, पोअं. शत्रुम्न मुढे, प्रशांत भोयर व चेतन शेंडे यांनी केली.