– गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुण गौरव करण्यात आला.
कन्हान :- बीकेसीपी शाळेच्या ५० व्या वर्षी शाळेच्या प्रागंणात विद्यार्थ्यांनी आपल्या देशातील सुप्रसिध्द महान संगीतकार व गायक यांना समर्पित त्यांच्या लोकप्रिय गायन व गाण्यावर विविध नुत्य, नाटिका, गायन सह सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थि ताना मंत्रमुग्ध करून शाळेचा वार्षिक महोत्सव थाटात साजरा करून शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरां च्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
बीकेसीपी शाळेच्या वार्षिक महोत्सवाचे प्रमुख अतिथी सिम्बायोसिस इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट नागपुर चे संचालक डॉ. समीर पिंगळे यांचे स्वागत करून प्राथमिक मुख्याध्यापिका रूमाना तुरक यांचे सह दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . यावेळी व्यवस्थापन समिती सदस्य पुष्पा गँरोला, महेश खंडेलवाल, अशोक भाटिया, मुख्याध्या पिका कविता नाथ प्रामुख्याने उपस्थित होते.
पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्या र्थ्यांनी सुप्रसिध्द महान संगीतकार व गायक यांना सम र्पित त्यांच्या लोकप्रिय गायन व गाण्यावर विविध नुत्य, नाटिका व गायन सह सांस्कृतिक कार्यक्रम सादर करू न उपस्थिताना श्रौत्यांना मंत्रमुग्ध केले होते. प्राथमिक मुख्याध्यापिका रुमाना तुरक यांनी शाळेच्या प्रगती पथाचा अहवाल प्रास्ताविकातुन सादर केला.
प्रमुख अतिथी डॉ. समीर पिंगळे यांनी आपल्या अनमोल शब्दात विद्यार्थ्यांना, पालकांना यथोचित मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या हस्ते मार्च २०२४ मध्ये दहावीत शाळेतुन व तालुक्यातुन प्रथम आलेला शिवकुमार होले, व्दितीय उत्कर्ष रहाटे, तुतिय आयुष दहिफळकर व ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे सात असे दहा विद्यार्थ्यांना रोख रक्कम शाळेच्या वतीने देऊन गुणगौरव करण्यात आला. त्याच बरोबर त्यांनी विद्या र्थिनी कु. अनन्या मंगर हिने राज्यस्तरावर ५०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक तर ६०० मीटर मध्ये राज्यस्तरावर रौप्य पदक पटकावले. आयुषी ठाकरे आणि वैष्णवी कोतपल्लीवार हयानी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आणि राष्ट्रीय स्तरावर चॅम्पियन झाल्याबद्दल समीर पिंगळे यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार तारकेश्वरी भुतानी हयांनी केले. वार्षिक महोत्सवाच्या यशस्विते करिता हायस्कुलच्या मुख्याध्यापिका कविता नाथ, प्राथमिक मुख्याध्यापिका रुमाना तुरक, शिक्षक विनय कुमार वैद्य, बीना सिंग, प्रीती नायडू, वैशाली जॉज, वृंदा तोडकर, ज्योत्सना लांजेवार, नरोत्तम धवड, क्रिडा शिक्षक अमितकुमार ठाकुर सर सह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षेक्तर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.