नागपूर :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची सदिच्छा भेट घेतली.
डॉ.मुळे यांनी संचालक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्रीमती बिदरी यांची भेट घेवून अनौपचारीक चर्चा केली. बिदरी यांनी नवीन जबाबदारीसाठी डॉ.मुळे यांना शुभेच्छा दिल्या. डॉ.मुळे यापूर्वी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक म्हणून कार्यरत होते. पदोन्नती ने त्यांची नागपूर-अमरावती विभागाच्या संचालक पदी नियुक्ती झाली आहे.