नागपूर :- चंद्रमणी नगरातील राजू वाघमारे याला तीन महिन्याचे चक्क 1285 युनिट दाखवून 25,867 रुपयाचे पाणी बिल दिले. राजू ने जुलै 2024 पर्यंतचे सर्व बिल 9 जुलै 2024 रोजीच भरलेले आहे. त्यामुळे त्याच्यावर कुठलाही बकाया नव्हता.
आत्तापर्यंत राजू गोविंदराव वाघमारे ला दर तीन महिन्यात शंभर ते दीडशे युनिट पर्यंतचे पाणी बिल यायचे. मीटर फॉल्टी असल्याने 1285 रीडिंग दाखवून रोज मजुरी करणाऱ्या राजू गोविंदराव ने आजोबाच्या नावाने आलेल्या अचानक 26 हजाराच्या बीलाने त्याने धास्ती घेतली आहे. त्याची ऑनलाईन व लेखी तक्रारही संबंधित विभागाला केलेली आहे.
जलप्रदाय विभागातील अधिकाऱ्यांनी धंतोली झोन क्रमांक 4 मध्ये येणाऱ्या झीबल हरबाजी वाघमारे, (ग्राहक क्रमांक 56028322) चंद्रमणी बुद्धविहार शेजारी असलेल्या चंद्रमणी नगरातील राजू गोविंदराव च्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या बिलातील चुकीची दुरुस्ती करावी, फॉल्टी मीटर बदलून टाकावे व ही चूक करणाऱ्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी बसपाचे प्रदेश मिडीया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केली आहे.