नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत शिक्षणानिमीत्याने बहीणीसोबत किरायाने राहणारी २३ वर्षीय फिर्यादी मुलीला आरोपी देवराव केशवराव गाणार वय ३७ वर्ष रा. सोमवारी क्वॉटर याने ओळखीचा फायदा घेवुन दिनांक १२.११. २०२४ चे २०.३० वा. ने दरम्यान, त्याचे घरी कोणी नसतांना फिर्यादी ही आरोपीचे घरी आली असता त्याने फिर्यादी मुलीचे मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. फिर्यादी मुलीने नमुद बाब कोणालाही सांगीतल्यास आरोपीने तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी फिर्यादी हिने दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे सक्करदरा येथे पोउपनि पांडे यांनी आरोपीविरूध्द कलम ७४ ३५१(३) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपीस अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे.