नागपूर :- फिर्यादीचा मुलगा नामे संम्युयल नरेंद्र त्रिवेदी, वय ३५ वर्षे, रा. अर्थ हाईट, फ्लॅट नं. १०२, न्यु आकाश नगर, नागपुर हे त्यांचे बजाज अॅव्हेंजर दुबाकी क. एम.एन. ३१ सि. डी. ३१८८ ने त्यांचे मित्राला भेटायल धंतोली येथे गेले होते. तेथून ते परत येत असताना पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत तपस्या विद्यालय समोर, मानेवाडा रिंग रोड वर एका काळ्या रंगाची लण्ड रोव्हर डिस्कव्हरी कार क. डब्ल्यु. वि. २० झेड ५१०१ चे वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीचे मुलाचे दुचाकीला धडक देवुन गभीर जखमी करून पळुन गेला. जखमी यांना उपचाराकरीता मेडीकल हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.
याप्रकरणी फिर्यादी नरेंद्र अवसानेश्वर त्रिवेदी, वय ७० वर्षे, रा. अर्थ हाईट, फ्लॅट नं. १०२, न्यु आकाश नगर, नागपुर यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे पोउपनी आठवले यांनी लॅण्ड रोवार डिस्कव्हरी कार चालकाविरुध्द कलम १०६(१) (२), १२५(१), १२५(२), २८१ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.