क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले पुण्यतिथी साजरी

कन्हान :- सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर येथे क्रांतीसुर्य महान समाज सुधारक स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा जोतिबा फुले यांच्या १३४ व्या निमित्य कार्य क्रमासह महात्मा ज्योतीबा फुले हयाना अभिवादन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

गुरूवार (दि.२८) नोहेंबर ला सायंकाळी ६.३० वाजता सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे क्रांतीसुर्य महान समाज सुधारक स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा जोतिबा फुले यांच्या १३४ व्या पुण्य तिथी कार्यक्रम रमेश बाजीराव चव्हाण यांच्या अध्यक्षेत, गंगाधरराव अवचट व दिनकरराव मस्के यांच्या प्रमुख हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण केली. सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

अध्यक्ष व प्रमुख अतिथी तसेच सुमित घोरपडे, अभिषेक निमजे यांनी आधुनिक समाजक्रांतीचे जनक प्रतिगामी व कर्मठ रूढी परंपरा विरोधात उभे आयुष्य लढा देणारे स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा जोतिबा फुले हयानी आपल्या स्वातंत्र्याचा व संविधानाचा खरा पाया या महात्म्याने रचला आहे, “जोतिबा रचला पाया, भीम झालेस कळस ” अश्या कार्याविषयी मार्गदर्शन कर ण्यात आले. सर्व उपस्थितांनी उभे राहुन दोन मिनिटे मौन पाळुन श्रध्दांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मनोहर कोल्हे सचिव यांनी स्त्री शिक्षणा चे जनक क्रांतीसुर्य महान सुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. सुत्र संचालन श्याम बारई ग्रंथपाल यांनी तर आभार प्रदर्शन कृणाल कोल्हे यांनी केले. याप्रसंगी स्वप्निल वकलकर, अनिकेत दिवे, अल्का कोल्हे, सानवी वानखेडे, कस्तुरी कोल्हे, चिश्लोक धावडे, स्वप्निल भेलावे, राहुल पारधी, रोशन तांडेकर, मनोज चिकटे आदी वाचक व सभासद उपस्थितीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निलज येथे लोकसहभागातुन बांधला वनराई बंधारा

Fri Nov 29 , 2024
– निलज गावकरी शेतक-यांना मिळणार लाभ. कन्हान :- प्रत्येक कार्य सरकारी यंत्रणे मार्फत शक्य नाही. याकरिता गावातील लोकांच्या सहकार्याने निलज गावात लोकसहभागातुन वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली.” गाव करी ते राव न करी ” ही म्हण लक्षात घेत निलज गावात लोकसहभागातुन वनराई बंधारा उदयास आला. आता या बंधाऱ्यामुळे परिसरातील जलस्तर उंचाविणार आणि परिणामी शेतीला त्याचा लाभ होणार असल्याने गावकरी सुखावले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com