आचारसंहिता भंगाच्या ५,२३० तक्रारी निकाली; ५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ५ हजार २८६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ५,२३० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ठाण्यात 20.75 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

Wed Nov 13 , 2024
मुंबई :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यात अंजूरगाव आणि आलीमघर खाडीमध्ये हातभट्टी केंद्रावर 11 नोव्हेंबर रोजी सामुहिक धाडसत्र मोहिम राबवून एकूण सात गुन्हे नोंदविले आहे. या कारवाईत 200 लीटर क्षमतेच्या 354 ड्रम्स, 1000 लीटर क्षमतेचे तीन बॉयलर व अन्य हातभट्टी साहित्याचा मुद्देमाल जप्त केला. सदर माल हा नाशवंत असल्यामुळे जागेवरच नष्ट करण्यात आला असून या मुद्देमालाची किंमत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com