नागपूर :- मध्य नागपूर विधानसभेचे भाजप चे उमेदवार आमदार प्रवीण दटके यांच्या जनसंवाद यात्रेचा जुनी मंगळवारी येथून शुभारंभ झाला.जुनी मंगळवारी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेत आशीर्वाद घेतला.तसेच प्रभागातील स्थानिक नागरिकांशी संवाद साधत सर्वांची विचारपूस केली,यावेळी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या यात्रेत आमदार प्रवीण दटके,गिरीष व्यास,श्रीकांत आगलावे,गिरीश देशमुख, विनायक डेहणकर, सुरज गोजे, बंडू राऊत,राजेंद्र नंदनकर,सुबोध आचार्य,शाम चांदेकर,जयंत पाध्ये, श्रद्धा पाठक,राजेशजी घोडपागे,शिरीष शिवणकर,कविता इंगळे, दुर्गेश घाटोले,पप्पू पानसे, भाजप पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.