– नागपूर रेल्वे स्थानकावर दोघांनाही घेतले ताब्यात
– मध्यरात्री प्लॅटफार्मवर गाडीच्या प्रतिक्षेत
– दानापूरची लव्ह एक्सप्रेस नागपुरात डिरेल
नागपूर :- दोघेही अल्पवयीन ती १६ ची तर तो १७ वर्षाचा. त्यांच्या मनात प्रेमाचे अंकुर फुटले आणि दोघेही दानापूरहून नागपूरसाठी निघाले. मात्र, नागपूरात त्यांच्या लव्ह एक्सप्रेस डिरेल झाली. आरपीएफच्या कर्तव्यदक्ष जवानाने दोघांनाही ताब्यात घेतले आणि चाईल्ड लाईनच्या मदतीने शेल्टर देण्यात आले.
रमेश (काल्पनिक नाव) असे त्या मुलाचे नाव आहे. तो केवळ १७ वर्षांचा आहे. दहावी पर्यंत त्याचे शिक्षण झाले. तर रिना (काल्पनिक नाव) ही बिहारची असून १६ वर्षाची आहे. सोशल मीडियावर त्यांची ओळख झाली. त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि त्यांच्यात बोलचाल सुरू झाली. नियमित बोलत असल्याचे घट्ट मैत्री झाली. घरून पळून जाण्याचा निर्णय घेतला. ५ नोव्हेंबरला दोघांनीही दानापूर रेल्वे स्थानकावर भेटण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या वेळेनुसार दोघेही भेटले आणि दानापूर एक्सप्रेसने नागपूरसाठी निघाले.
रात्री ते नागपूर रेल्वे स्थानकावर आले. रमेशची बहिण राजनांदगावला राहाते. नागपूर रेल्वे स्थानकाहून बहिणीच्या घरी त्यांना जायचे होते. दोघेही प्लॅटफार्म नंबर एकवर गाडीच्या प्रतिक्षेत होते. आरपीएफचे मध्यरात्री कर्तव्यावर असताना त्यांचे लक्ष रमेश आणि रिना यांचेवर पडले. दोघेही अल्पवनीय असल्याने त्यांची आस्थेनी विचारपूस करण्यात आली. चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ठाण्यात आणले. त्यांचे समूपदेशन करून त्यांना शेल्टर देण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.