– डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र बार्टी
नागपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस, दिनांक 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असल्याचे सांगीतले. शिकले, शिकवले, सर्वांना संघटीत केले. त्यांच्या या कार्याच्या सन्मानार्थ शासनाने 2017 पासून 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचे योजिले आहे. त्यानुसार राज्यातील शाळा महाविद्यालयात विविध शैक्षणिक कार्यक्रम घेऊन विद्यार्थी दिवस साजरा करण्यात येतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टीचे) महासंचालक सुनील वारे, निबंधक इंदिरा अस्वार, यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 नोव्हेंबरला बार्टी प्रादेशिक कार्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी बार्टीचे सा. प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके यांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक जीवनातील प्रेरक अनुभवाची माहिती दिली. आजन्म विद्यार्थी राहण्याचे. नवे काहीतरी शिकत राहण्याचे महत्त्व विषद केले. यावेळी बार्टीचे तुषार सुर्यवंशी, शीतल गडलिंग, सुनीता झाडे, सलमान शेख, नागेश वाहूरवाघ, सरीता महाजन, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.