३० नोव्हेंबर पुर्वी सादर करावा हयातीचा दाखला

– सेवानिवृत्त कर्मचारी व कुटुंबनिवृत्तीधारक यांना मनपाचे आवाहन

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतील सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व कुटुंबनिवृत्तीधारक यांनी त्यांच्या हयातीचा दाखला ३० नोव्हेंबरपुर्वी मनपा लेखा विभागात सादर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

हयातीचा दाखला हा भारतीय स्टेट बँक चंद्रपूर येथील मुख्य शाखेतुन प्रमाणित केलेला असावा तसेच हयातीचा दाखल स्वप्रमाणीत करून त्यावर त्यांचा मोबाईल क्रमांक नमुद असणे आवश्यक आहे. सोबतच आधार कार्ड व पॅनकार्डची छायांकीत प्रत ( झेरॉक्स ) जोडण्यात यावी. हयात प्रमाणपत्र ३० नोव्हेंबर २०२४ पूर्वी मनपा लेखा विभागास प्राप्त न झाल्यास पुढील पेन्शन रोखण्यात येणार असल्याने दिलेल्या मुदतीत हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जनादेश मागताना भाजपा करणार लोकप्रबोधन पॉडकास्टमधून घेणार विकास कामांचा आढावा  - ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची माहिती

Wed Nov 6 , 2024
मुंबई :- विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करत असतानाच भारतीय जनता पार्टी जनादेश मागताना लोकप्रबोधनही करणार असून त्यासाठी ‘नक्की काय चाललंय?’ हा पॉडकास्ट सुरू करण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते व माजी खासदार डॉ.विनय सहस्रबुद्धे हे त्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखतीद्वारे संवाद साधत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात देशात गेल्या साडेदहा आणि राज्यात गेल्या साडेसात वर्षात झालेल्या विकास कामांचा आढावा आणि भविष्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com