नागपूर :- पोलीस हवालदार आणि त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजा चिखली (खुर्द) खसरा क्रमांक 23 मध्ये श्री संत ज्ञानेश्वर गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित नागपूर यांनी आखलेल्या ले-आउट मधील भूखंड क्रमांक 32 हा सगळे मिळून आममुखत्यार पत्र व बांधकामाचा विकास करारनामा रजिस्टर्ड केलेला होता आणि हा करारनामा आरोपी १ दोन ३ यांनी मिळून स्वखुशीने करून दिलेला होता. आरोपींमध्ये पोलीस हवालदार विलास रमेश चिंचुलकर, त्याची आई चंदा रमेश चिंचुलकर आणि बहीण दर्शना चिंचुलकर यांचा समावेश आहे. क्राइम ब्रँचचे हवालदार विलास चिंचुलकर, रा. अमर नगर, मानेवाडा, त्याची आई व बहीण, तक्रारकर्ता शशांक खेकरे, कल्याणेश्वर नगर, मानेवाडा आणि अर्जुन शहाणे, बिल्डर हे दोघे मिळून काम करतात.
फ्लॅट स्कीम चे काम जवळ जवळ 90% पूर्ण झालेले असून विलास चिंचुलकर यांच्या डोळ्यात आले असून त्यांनी गार्ड जवळून जबरदस्तीने फ्लॅटच्या चाब्या घेऊन कामगारांना हाकलून दिले आणि स्वतः कब्जा करून बसलेला आहे. त्यांनी चिंचुलकर कुटुंबीयांच्या जागेवर फ्लॅट स्कीम बांधण्याचा करार केला होता. ही फ्लॅट स्कीम पाच फ्लॅटची काढलेली होती. आरोप आहे की चार फ्लॅटची विक्री करूनही विलासने चाब्या स्वत:कडेच ठेवल्या आणि आता ताबा देण्याच्या बदल्यात एक कोटी रुपयांची मागणी करत असल्याचे पीडित बिल्डरने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले. पीडित बिल्डरच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी शिपाई विलास चिंचुलकर आणि त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. याआधीही विलास काही वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांसोबत राहत असल्याची चर्चा आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी काहींवर कारवाई केल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही तर एकाला बडतर्फही करण्यात आले आहे.