दिवाळीत घरातील अनुपयोगी वस्तु संकलनासाठी मनपाची १५० केंद्रे

नागपूर :- दिवाळीनिमित्त घरोघरी स्वच्छता केली जाते. आपले शहर हे देखील आपले घरच आहे. स्वच्छते दरम्यान घरातून निघणाऱ्या अनुपयोगी वस्तूंचे संकलन करून त्याचा पुनर्वापर करण्याचा महत्त्वाचा निर्णय नागपूर महानगरपालिकेने स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियानंतर्गत घेतला आहे. घरातून निघणाऱ्या वापरात नसणाऱ्या अनुपयोगी वस्तूंचा स्वीकार करण्यासाठी मनपाने दहाही झोन निहाय १५० अनुपयोगी वस्तु संकलन/स्वीकार केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला असून, येत्या २६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांनी आपल्या जवळच्या केंद्रावर वर्गीकृत स्वरूपातील अनुपयोगी वस्तु आणून द्यावा व आपल्या शहराला स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक साकरण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ अभियान संदर्भात मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षामध्ये मंगळवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विविध माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, घनकचरा व्यवस्थापन संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते.

‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ अभियानाबद्दल माहिती देत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ या मोहिमे अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अभियानांतर्गत येत्या शनिवार २६ ते सोमवार २८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये मनपाच्या सर्व आरआरआर सेंटरसह प्रभागनिहाय तयार करण्यात आलेल्या १५० अनुपयोगी वस्तु संकलन/स्वीकार केंद्रांवर दिवाळीतील सफाई मध्ये निघणारा पुनर्वापरयोग्य तसेच अन्य अनुपयोगी वस्तु संकलीत केला जाणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या घरातील पुनर्वापरण्यात येणाऱ्या किंवा निरुपयोगी वस्तु/साहित्य जसे कपडे, लाकडी वा प्लास्टिकच्या वस्तू, घरातील भांडी, खुर्च्या, खेळणी, कपाट, चपला /जोडे, पुस्तकांची रद्दी, इलेक्ट्रॉनिक वस्तू या संकलन केंद्रामध्ये जमा करून गरजुवंताना लाभ देण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त डॉ. चौधरी यांनी केले.

वर्गीकृत स्वरूपात अनुपयोगी वस्तु स्वीकार केंद्रावर जमा करून अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविणाऱ्याच्या नागरिकांचे घर, सोसायटीच्या दारावर नागपूर महानगरपालिकेद्वारे ‘थँक यू’ चे स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. हे विशेष

पर्यावरणपूरक दिवाळीसाठी विविध उपक्रम

‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ मोहिमे अंतर्गत २१ ते २४ ऑक्टोबर दरम्यान दररोज दहाही झोनमधील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये ‘स्वच्छ दिवाळी सखोल स्वच्छता’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी दहाही झोनमधील १९ दहनघाटांची स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी ‘हर घर स्वच्छता के साथ दिवाली’ या थीमसह घरोघरी दिव्यांची सजावट तसेच स्वच्छता संदेश देणारी रांगोळी काढण्यात येईल. या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात शहरातील जनतेचा सहभाग असणार आहे. २५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये मनपाच्या आयईसी चमूद्वारे बाजारपेठ आणि व्यापारी संकुलाच्या परिसरात ‘व्होकल फॉर लोकल’ आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे, असेही डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

सफाई कर्मचार्यांचा सत्कार व ५९ चौकांची स्वच्छता

आपल्या शहराला स्वच्छ, सुंदर व स्वस्थ साकारण्यासाठी नेहमी तत्पर राहणार्या सफाई कर्मचार्यांचा सत्कार मनपाद्वारे केला जाणार आहे. येत्या २७ ऑक्टोबर रोजी शहरातील घराघरातून कचरा संकलीत करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असून, सोमवार २८ ऑक्टोबर रोजी शहरातील महापुरूष, स्वातंत्र्य सेनानींच्या एकूण ५९ पुतळ्यांची व चौकांची स्वच्छता करण्यात येणार आहे.

दिवाळीत मैदानांची स्वच्छता

स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभिनांतर्गत नागपूर शहरातील विविध मैदानांची स्वच्छता येत्या ४ ते ७ नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. शहरातील मैदाने स्व्च्छ व्हावी याकरिता या उपक्रम हाती घेण्यात आला असून, नागरिकांनी देखील मोठ्या संख्येत उपक्रमात सहभागी होत घराप्रमाणे शहराला देखील स्व्चछ, सुंदर साकारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियान अंतर्गत मनपाच्या विविध उपक्रमामध्ये नागरिक, नागरिक मंडळ/ समुह, अशासकीय संस्था (एनजीओ), स्वयं सहायता समूह (SHG), शाळांचे विद्यार्थी, युथ ग्रुप यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आयुक्तांच्या निर्देशानंतर अतिक्रमण व स्वच्छतेच्या कार्यवाहीला गती

Wed Oct 23 , 2024
– मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी घेतला सेमिनरी हिल्स ते अंबाझरी येथील कामाचा आढावा नागपूर :- सेमिनरी हिल्स परिसरातील अतिक्रमण निर्मूलन कार्यवाही तसेच परिसरातील स्वच्छतेबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सक्त निर्देश दिल्यानंतर परिसरातील कार्यवाहीला गती आली आहे. मंगळवारी (ता.२२) मनपा आयुक्तांनी स्वत: परिसरात भेट देउन कार्यवाहीचा आढावा घेतला. त्यांनी सेमिनरी हिल्स येथील अतिक्रमण कार्यवाही ते अंबाझरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com