सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 67 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरूवार (17) रोजी शोध पथकाने 67 प्रकरणांची नोंद करून 33,400/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 5,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 2,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 3,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे,प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 26 प्रकरणांची नोंद करून 5,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून 10,000/- रुपयांची दंड वसूल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 5,000/- वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत मे. गार्डन ग्लोरी यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोन अंतर्गत मे. सुर्दशन मोटर यांनी कार्यालयाच्या बाजुला कचरा जाळल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. अश्विनी गोलचा बिल्‍डर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत ठाकूर कुबलानी यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. श्याम किराणा स्टोर यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. नीनावे डेली निड्स यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत अवदेश मिश्रा यांनी आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. रुपेश जेठानी यांनी मनपाचे चेंबर तोडल्याने रस्त्यावर पाणी वाहत असल्याबद्दल रु. 5,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पटोले यांच्या हस्ते Needly sos महिला सुरक्षा पर्सनल सेफ्टी ॲपचे लोकार्पण

Fri Oct 18 , 2024
नागपूर :- महिला सुरक्षा, वैयक्तिक सुरक्षा आणि बाल सुरक्षा आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा विषय बनलेला आहे. त्या संदर्भात आत्मसुरक्षेसाठी सर्वांच्या मोबाईलमध्ये सर्वोत्तम ॲप असणे आवश्यक झाले आहे.यापार्श्वभूमीवर ‘स्वयम्’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल विलास मुत्तेमवार यांच्या पुढाकाराने Needly sos महिला सुरक्षा पर्सनल सेफ्टी ॲप उपलब्ध करून देण्यात येत आहे. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com