कुख्यात गुंड स्थानबध्द्

नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक १७.१०.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे लकडगंज, सदर, नंदनवन, हुडकेश्वर व तहसील नागपूर शहर चे ह‌द्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे शैलेष ज्ञानेश्वर केदार, वय ३३ वर्ष रा. संती रोड, इतवारी हायस्कुल जवळ, पोलीस ठाणे लकडगंज नागपूर यास महाराष्ट्र झोपडपट्‌टीदादा, हातभ‌ट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंना काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम, १९८१ अंतर्गत दिनांक १७.१०.२०२४ रोजी स्थानचध्द आदेश पारीत केला. त्यास दि. १७.१०.२०२४ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. शैलेष ज्ञानेश्वर केदार याचेविरूध्द पोलीस ठाणे लकडगंज, सदर, नंदनवन, हुडकेश्वर व तहसील नागपूर शहर येथे फसवणुक करणे, फसवणुक करण्यासाठी बनावटीकरण करणे, बनावट दस्ताऐवज खरा म्हणुन वापरणे, खंडणी करिता एखादया व्यक्तीला मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भीती घालणे, खंडणी करिता एखादया व्यक्तीला मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भीती घालून खंडणी मागणे, कैव्य परवान्याशिवाय सावकारी कर्ज देणे, कर्ज वसुली करिता कर्जदाराचा विनयभंग करणे, आत्महत्येला अपप्रेरणा देणे, खून करण्यासाठी अपहरण करणे, दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पुर्व तयारी करून नंतर गृह अतिक्रमण करणे, प्राणघातक शस्वासह गैरकायदयाची मंडळी जमवुन दंगा करणे, एखादया व्यक्तीला खोटा पुरावा देण्यासाठी धमकी देणे, खंडणी करिता एखादया व्यक्तीला मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भीती घालणे, आपखुशीने दुखापत करणे, अपराधीक जिवे ठार मारण्याची धमकी देणे, शांतता भंग करण्याचे उ‌द्देशाने जाणीवपुर्वक अपमान करणे, अश्लील शिवीगाळ करणे, अग्नीशस्त्र व प्राणघातक शस्य जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्तेविरूध्दवे तसेच शरीराविरूध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदर स्थानबध्द इसमाविरुध्द सन २०१६ मध्ये लकडगंज पोलीसांकडून ११० (ई) (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर २) सन २०२३ मध्ये प्र. स्थानबध्द इसमाविरूध्द कलम ११० (६) (ग) सी.आर. पी.सी. अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती त्याचेकडुन रू. ५०,०००/- रक्कमेचे ०१ वर्ष मुदतीकरीता चांगल्या वर्तणुकीसाठी अंतीम बंधपत्र घेण्यात आले, तरी सुद्धा नमुद प्र. स्था. इसमाने उपरोक्त प्रतिबंधक कारवाईंचे उल्लंघन करून अलीकडील काळात पोलीस ठाणे तहसील हद्दीत खंडणी करिता एखादया व्यक्तीला मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भीती घालणे, आपखुशीने दुखापत करणे, शांतता भंग करण्याचे उद्देशाने जाणीवपुर्वक अपमान करणे, वैध्य परवान्याशिवाय सावकारी कर्ज देणे, इत्यादी अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे केलेले आहेत.

अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे शैलेष ज्ञानेश्वर केदार, याची अपराधीक कृत्ये असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे लकडगंत, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला, त्याअन्वये स्थानयध्द प्राधिकारी पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे ठेवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Fri Oct 18 , 2024
नागपूर :-फिर्यादी गोपाल ग्यानीलाल राहंगडाले वय ७१ वर्ष रा. राजे दहेगाव, स्वाती सितारामदास महाजन मंदीर समोर, जवाहर नगर, भंडारा यांचा मुलगा नामे विशांत रहांगडाले यांचे घराचे वास्तु पुजन असल्याने ते जयंती नगरी, बेसा रोड, नागपूर येथे आले होते. दिनांक १६.१०.२०२४ चे ०८.०० वा. ने सुमारास, पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीतून मुख्य बस स्थानक येथुन फिर्यादी व त्यांची पत्नी हे दोघे नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com