…..अखेर कोदामेंढी ग्रामपंचायत मध्ये पथदीप घोटाळा झाल्याचे मासिक सभेत शिक्कामोर्फत

– संबंधित विभागाने मुक्कामी न राहणारे सरपंच सचिव सह दुकानदारावर गुन्हे दाखल करण्याची गावकऱ्यांची मागणी

कोदामेंढी :- येथील मुक्कामी न राहणारे रामटेक वरून अपडाऊन करणारे सरपंच आशिष बावनकुळे यांनी येथील मुक्कामी न राहणारी येथून 75 किलोमीटर दूर असणाऱ्या नागपूरवरून अपडाऊन करणारी सचिव एस. एन .पाटील (रामटेके) यांच्याशी संगणमत करून 20/ 05 /2024 ला नागपूर येथील एम. एम. इंटरप्राईजेस या दुकानातून ग्रामपंचायतचे स्वतःचे संसाधने या निधीच्या स्त्रोत अंतर्गत एकही पथदीप न खरीदता चार लक्ष 88 हजार 474 रुपये पथदीप खरेदी करण्याचे बोगस बिल जोडून घोटाळा केल्याचे दिनांक 9 ऑक्टोबर बुधवारच्या मासिक सभेत शिक्कामार्फत झाले. त्यामुळे येथील सरपंच सचिव व बोगस बिल देणाऱ्या दुकानदारावर संबंधित विभागाने गुन्हे दाखल करून, पुढील आणखी घोटाळे होऊ नये म्हणून मुक्कामी न राहणारे जनतेतून निवडून आलेले सरपंच आशिष बावनकुळे यांना तात्काळ चौकशी करून ,पदमुक्त करावे व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीबरोबर येथील जनतेतून नवीन सरपंच निवडणुकीसाठी निवडणूक घ्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत सविस्तर बातम्या सदर वृत्तपत्रात मागील एक आठवड्यापासून सतत प्रकाशित होत आहे हे विशेष.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 9 ऑक्टोंबर बुधवार ला झालेल्या मासिक सभेत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी नागपूर येथून घेतलेले पथदिवे कुठे आहे ?कोणत्या खांबाला लावले आहे? अशा प्रश्नाच्या भडीमार करताच येथील मुक्कामी न राहणारे सरपंच आशिष बावनकुळे व सचिव एस. एन .पाटील यांनी सांगितले की, ग्रामपंचायतचे स्वतःचे संसाधने या निधीच्या स्त्रोत अंतर्गत एकही पथदीप घेतला नसून त्या ऐवजी महिला स्वयंसहायता बचत गटांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे, अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे या पंधरावा वित्त आयोगाच्या निधीच्या 40% अबंधित निधीच्या स्त्रोत गरिबी मुक्त आणि उपजीविका (रोजगार) वृद्धीस पोषक गाव अंतर्गत खरेदी केलेले किंवा खरेदी करणार असलेले डाळ मिल, आटा मिल, पापड तयार करणारी मशीन ,हे खरेदी केल्याचे सांगितले. मात्र शासनाच्या जीआर नुसार हे बचत गटाचे देण्यात येणारे साहित्य ग्रामपंचायतचे स्वतःचे स्त्रोत या निधीस्त्रोत अंतर्गत घेताच येत नसून नियमबाह्य व बेकायदेशीरपणे सरपंच सचिवाने पथदीप खरेदीत चार लक्ष 88 हजार 474 रुपयाच्या घोटाळा केल्याचे शिक्कामार्फत झालेले आहे.

संबंधित विभाग घोटाळे करणाऱ्या सरपंच ,सचिव, दुकानदारावर केव्हा गुन्हे दाखल करतो व सरपंच केव्हा पदमुक्त होतो ,याकडे येथील ,परिसरातील तालुक्यातील व समस्त जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

याप्रसंगी मासिक सभेला सरपंच आशिष बावनकुळे ,उपसरपंच गोपाल गिरमेकर ,ग्रामपंचायत सदस्य विष्णू बावनकुळे, सदानंद मेश्राम, रवी ठवकर, खुशाल शिवणकर ,अनिता हटवार, कोमल खडसे ,सचिव एस. एन. पाटील (रामटेके )मंदा बावनकुळे, शालू बावनकुळे, सविता हटवार, सुशीला जुगनायके, छाया गजभिये, मनीषा पर्वत, रेखा धनरे, लीलावती वरखडे ,इंदू शेंडे ,जोशीका हटवार, रत्नकला वंजारी, नलिनी देवतळे ,रमेश बारइ , अविनाश बावनकुळे सह गावकरी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रतन टाटा शाश्वत भारतीय मूल्यांचे मूर्त रूप, देशाचे विवेक रक्षक - राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

Fri Oct 11 , 2024
मुंबई :-महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी भारतीय उद्योग जगताचे पितामह आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जमशेदजी टाटा यांनी दीडशे वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या टाटा साम्राज्याचे श्री रतन टाटा हे मुकुटमणी होते. आधुनिक व्यवस्थापकीय तत्त्वांचा अंगीकार करताना रतन टाटा यांनी समूह संस्थापकांच्या दृष्टिकोनाबाबत कधीही तडजोड न करता टाटा समूहाला एक विश्वसनीय भारतीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com