नागपूर :- भारतीय जनता पार्टीतर्फे रविवारी (ता.6) उत्तर नागपूरमधील बिनाकी येथे महाजनसंपर्क अभियान राबविण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्याचा प्रचार केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेले विकसीत भारताचे व्हिजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साधलेला विकास आणि लाडकी बहीण योजनेद्वारे महिला भगिनींना सक्षमतेचा मार्ग दाखविणारे ‘देवा भाऊ’ या सर्वांच्या कार्याची महती बिनाकी येथील घरोघरी नागरिकांना पटवून देण्यात आली.
यावेळी सर्वश्री शंकर मेश्राम, संजय भगत, नेताजी गजभिये, गुड्डूजी गुप्ता, महेंद्र प्रधान, रमेश पडाण, दिलीप मेश्राम, अंकित चन्ने, राजेश हाथीबेड, प्रकाश ठाकरे, यशवंत वैद्य, मनोज नंदेश्वर, विक्की बगले, मोरेश्वर हेडाऊ, उत्तम पटेल, सोमेश पाटील, मोसमी वासनिक, किरण सायगन, माधुरी झाडे, संघपाल मेश्राम,किशोर सायगन, विनय गुप्ता, विक्रम डुंबरे, रॉबिन गजभिये, नरेश वंजारी, कपिल वासनिक, राजकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.