ऑक्सीजन बर्ड पार्कचे लोकार्पण आज

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ऑक्सीजन बर्ड पार्कचे लोकार्पण उद्या, शनिवार दि. २८ सप्टेंबरला होणार आहे. ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १२ वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धा मार्गावरील जामठा क्लोव्हर लिफ येथे हा ऑक्सीजन पार्क साकारण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार प्रवीण दटके, आमदार अभिजित वंजारी, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार कृपाल तुमाने, आमदार अनिल देशमुख, आमदार नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार विकास ठाकरे, आमदार समीर मेघे, आमदार आशीष जयस्वाल, आमदार टेकचंद सावरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जागतिक रेबीज डे निमित्त अँटी रेबीज लस शिबिरे

Sat Sep 28 , 2024
– मनपा आणि प्यार फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम चंद्रपूर :- भटक्या व मोकाट कुत्रांचा नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी शहरातील सर्व भटक्या व पाळीव कुत्र्यांना अँटी रेबीज लस (एआरव्ही) देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका व प्यार फाऊंडेशनच्या संयुक्त वतीने २८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज डेनिमित्त अँटी रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. कुत्र्यांमधील रेबीज संक्रमण टाळण्यासाठी त्यांना ‘रेबीज प्रतिबंधक लस’ दरवर्षी देणे गरजेचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com