शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी येथे जीवशास्त्र मंडळाची स्थापना 

नागपूर :- श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय पवनी हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व व्यक्तिमत्त्व विकासाला नेहमीच प्राधान्य देत आले आहे. विविध कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग असावा व त्यांना शिक्षणाचा आनंद लुटता यावा म्हणून १८ सप्टेंबरला महाविद्यालयात जीवशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यी मंडळाची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. नवनियुक्त सदस्यांचा शपथविधीचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. विजय लेपसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहूणे डाॅ. विलास डोईफोडे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, भालेराव विज्ञान महाविद्यालय, सावनेर तथा आहारतज्ज्ञ रेखा अणे, नागपूर, विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

आजच्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्य्यांच्या नेतृत्व गुणाला चालना मिळण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. लेपसे यांनी केले. विद्यार्थ्यी मंडळाचे महत्त्व व स्थापनेमागील उद्दिष्ट डाॅ. सिमा कडू यांनी आपल्या प्रास्ताविकातून विषद केले. नवनियुक्त कार्यकारिणीतील सदस्यांना प्राणिशास्त्र विभागप्रमुख डाॅ. भूवनेन्द्र रहिले यांनी निसर्ग आणि जैवविविधता संवर्धन करण्याबाबत शपथ दिली. रेखा अणे यांनी पौष्टिक आहार आणि त्याची आजच्या काळात गरज या विषयावर उपस्थित कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डाॅ. विलास डोईफोडे यांनी जीवशास्त्र विषयात पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरांवर उपलब्ध असलेले विविध अभ्यासक्रम आणि भविष्यातील संधी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा जॅम, सीयुईटी सारख्या प्रवेश परीक्षा देऊन आय. आय. टी. आणि केंद्रीय विद्यापीठात उच्च शिक्षण घ्यावे असेही प्रतिपादन डॉ. डोईफोडे यांनी केले.

या प्रसंगी महाविद्यालयात पौष्टिक आहार स्पर्धा आयोजित केल्या गेली. स्पर्धेचे परीक्षण रेखा अणे आणि किरण लेपसे यांनी केले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे आयोजन डाॅ. सीमा कडू आणि डाॅ. अंकीता टेकाडे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. संजय घुगल यांनी केला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन डाॅ. अविनाश अणे, आय. क्यू. ए. सी. समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर नवनियुक्त अध्यक्ष  निकीता बावणकर आणि सचिव निशा श्रीरामे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन मंडळाच्या उपाध्यक्षा मोहीनी नक्षिणे हिने तर आभार श्रीरामे हिने व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

६० हजार से १.१२ लाख तक यात्री संख्या

Thu Sep 26 , 2024
*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपुर मेट्रो रेल परियोजना) • मेट्रो से आरामदायक यात्रा करे नागपुर :- सार्वजनिक यातायात मे नागरिको कि पसंदीदा यातायात सेवा के रूप मे नागपुर मेट्रो को लोग पसंद कर रहे है ! मेट्रो यह यातायात का सर्वोत्तम, सुलभ, सुविधाजनक, किफायती और सुरक्षित साधन है ! नोकरीपेशा लोगो के लिए,व्यावसायिको के लिए और विशेषतः छात्रो के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com