काटोल हद्दीत अवैधरित्या मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची कारवाई

काटोल :- पोलीस ठाणे काटोल हद्दीतील पेठबुधवार परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून आजूबाजूचे परीसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांना मिळाल्याने पोस्टे काटोल हद्दीतील पेठबुधवार परिसरात सुरू असलेल्या अवैधरीत्या गावठी पद्धतीने हातभ‌ट्टी लावुन मोहाफूल गावठी दारू गाळणाऱ्या एकूण ०२ इसमांवर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या गावठी पद्धतीने हातभट्टी लावून मोहाफूल गावठी दारू गाळणारे ०१ महिला आरोपी व फरार आरोपी नामे गणेश हागोने रा. पेठबुधवार काटोल यांचे ताब्यातून एकुण १) प्लॅस्टिक डबकित एकूण ६६ लिटर मोहाफुल गावठी दारू एकूण किंमती ३३००/-रू. २) २०० लिटर मोहफुल सडवा रसायन एकूण किंमती ४०००/- रू. व इतर दारू गाळण्याचे साहित्य किंमती ३०००/-रू. असा एकुण १०३००/- रू. चा मुद्दे‌माल जप्त करून नष्ट करण्यात आला. ०२ आरोपीतांविरूद्ध कलम ६५(ई), (एफ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये ०२ गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश चुमाळ यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनी मनोज गदादे, सपोनी आशिष ठाकूर, पोहवा ईकबाल शेख, पोहवा राजू रेवतकर, मपोहवा कविता बछले, पोशी धोंडुतात्या देवकते, चालक पोशी आशुतोष लांजेवार, सुमित बांगडे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धारदार शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

Wed Sep 25 , 2024
सावनेर :- सावनेर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, पोस्टे सावनेर अंतर्गत हेटी (नंदाजी) येथे दि. २३/०९/२४ चे २१/४६ वा. २२/२५ वा. दरम्यान महेश भुरचंद्र राउत, वय ३६ वर्ष रा. हेटी (नंदाजी) ता. सावनेर ना.ग्रा हा तलवार घेवून फिरत आहे. अशी माहिती मिळाल्याने पोउपनि वी जी राठोर, सोबत पोलीस कर्मचारी सह गावात पोहचलो व आरोपी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com