येत्या 48 तासात सिगारेट व तंबाकुजन्य पदार्थ विक्री न थांबविल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार – मुख्याधिकारी संदीप बोरकर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- शासकीय नियमानुसार शाळा ,महाविद्यालय तसेच शालेय, महाविद्यालय वस्तीगृहापासून 100 मीटर अंतराच्या आत गुटखा वा तंबाकुजन्य पदार्थाचो विक्री करण्यात येऊ नये असे आदेश आहेत मात्र बऱ्याच ठिकाणी या आदेशाची अवहेलना तर होत नाही ना हे पडताळून पाहण्यासाठी कामठी नगर परिषद मुख्याधिकारी संदीप बोरकर व सहकारी कर्मचारी स्वच्छता अभियंता वीरेंद्र ढोके,विजय मेथीयां, दर्शन गोंडाने, सचिन बिल्लरवान,अमोल कारवटकर यांनी आज कामठी शहरातील सर्व शाळा ,महाविद्यालय परिसरातील पानठेले व दुकान विक्रेत्यांना प्रत्यक्ष भेट दिली दरम्यान कुण्याही दुकान वीक्रेत्याकडे सिगारेट व अन्य तंबाकू जन्य पदार्थ आढळून आले नाही तरी सावधानतेचा ईशारा म्हणून सिगारेट व अन्य तंबाकू जन्य पदार्थ कायदा 2003 चे गांभीर्य लक्षात आणून दिले. व शाळा व महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात असलेल्या सर्व पानठेले व दुकान विक्रेत्यांनी येत्या 48 तासात सिगारेट व अन्य तंबाकू जन्य पदार्थ विक्री थांबवावी अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा ताकीदपूर्ण ईशारा कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील 6 हजार 858 बाधित घरधारकांना 6 कोटी 85 लक्ष रक्कम वितरित

Tue Sep 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने बहुतेक घरे बाधित होऊन जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले होते .तेव्हा या अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या बाधित घरधारकाना नुकसान भरपाई मिळावी यासाठी कामठी तालुक्यातील स्थानिक प्रशासनासह नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांच्या अथक प्रयत्नाला यशप्राप्त होत कामठी तहसील प्रशासनाला खावटी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com