तलवारीने केक कापणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद

पारशिवनी :- पो.स्टे. पारशिवनी हद्दीतील पातीमाता मंदिराचे मागे, खारी पारशिवनी येथील राहणारे नंदकिशोर आनंदराव मस्के याचा दिनांक १४/०९/२०२४ रोजी वाढदिवस असल्याने वाढदिवसाचे अनुषंगाने ठेवलेल्या कार्यक्रमात नंदकिशोर आनंदराव मस्के व त्याचा भाऊ गौरव आनंदराव मस्के या दोघांनी एका मोठ्या लोखंडी तलवारीने केक कापले व त्याचा मोबाईलवर व्हीडीओ तयार करून घेऊन तो व्हीडीओ WhatsApp Status वर ठेवले होते, असे निदर्शनास आल्याने पोलीस निरीक्षक राजेश थोरात पो.स्टे. पारशिवनी यांनी घटनेची दखल घेता पोउपनि भताने, पोहवा मुदस्सर जमाल, पो.शि वीरेंद्रसिंग बौधरी, पोशि राकेश वंधाटे व चापोहवा संदीप वळेकर यांचे पथक नेमून ते मौजा पारशिवनी प्रभाग क्र. १० येथील नंदकिशोर मस्के याचे राहते घरी जावून त्याचेकडे विचारपूस केल्यावर त्याने दिनांक १४/०९/२०२४ रोजी त्याचा वाढदिवस असल्याने त्याने तसेच त्याचा भाऊ नामे गौरव आनंदराव मस्के या दोघांनी आळीपाळीने त्यांच्याकडे असलेली एका मोठ्या लोखंडी तलवारीने केक कापले होते, अशी कबुली दिल्याने त्याचे कडून एक लाल रंगाचे कव्हर मध्ये ठेवलेली व लाकडी मुठ असलेली लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.

सदर कार्यवाही ही पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग रमेश बरकते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन, पारशिवनीचे ठाणेदार राजेशकुमार थोरात, पोउपनि शिवाजी भताने, पोहवा मुदस्सर जमाल, पोअं विरेंद्रसिंग चौधरी, राकेश बंधाटे, पृथ्वीराज चौहान, चालक संदीप वळेकर यांचे पथकाने पुर्ण केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नरखेड हद्दीमधील जुगार अड्डयावर धाड

Sat Sep 21 , 2024
– नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई  नागपूर :- पोस्टे नरखेड येथील स्टाफ पोस्टे हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, पोलीस स्टेशन नरखेड हद्‌दीतील हनुमान मंदिराच्या मागे मौजा सारडी शिवार येथे काही लोक ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोस्टे नरखेड येथील स्टाफ यांना प्राप्त झाले वरून सदर स्टाफ हनुमान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com